‘गोव्यातील दाबोळी येथील केशव स्मृती विद्यालय या सरकारी अनुदानित शाळेच्या विद्यार्थ्यांना ‘मशीद दर्शन’च्या नावाखाली मशिदीत नेऊन नमाजपठणासंबंधी कृती करण्यास भाग पाडणे आणि विद्यार्थिनींना गणवेशाची ओढणी हिजाबप्रमाणे परिधान करण्यास लावणे’, ही अतिशय संतापजनक गोष्ट आहे. ती पूर्वनियोजित घटना असल्याचे उघड होत असल्याने अधिक गंभीर आणि ‘हिंदूंनी खडबडून जागे झाले पाहिजे’, याची जाणीव करून देणारी आहे. येथे मौलानांनी विद्यार्थ्यांना इस्लाममधील शब्दांचे अर्थ आणि नमाजपठणाचे महत्त्व यांची माहितीही सांगितली. एवढ्यावरच न थांबता ‘तुम्ही दगडाच्या देवाला पूजता. आम्ही आकाशातील देवाला पूजतो’, अशी हिंदु धर्माशी तुलना करून विद्यार्थ्यांची दिशाभूलही केली. या घटनेनंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांना आंदोलन करावे लागले, पोलिसांत तक्रार द्यावी लागली, तेव्हा कुठे संबंधित प्राचार्य शंकर गावकर यांना निलंबित करण्यात आले.’ (१३.९.२०२३)