बागेश्‍वर धाम (मध्‍यप्रदेश) येथील पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री म्‍हणजे भारतातील हिदूंचा आवाज !

‘हिंदु धर्म हा खरोखरच श्रेष्‍ठ आहे’, हे जेव्‍हा स्‍पष्‍ट होईल, तेव्‍हा धर्मांतरित झालेल्‍यांना परत येण्‍याची इच्‍छा होईल !

ऑगस्‍ट २०२२ मध्‍ये मी खजुराओ (मध्‍यप्रदेश) ते देहली असा विमानप्रवास करणार होते. खजुराओ हा विमानतळ लहान आहे, त्‍यामुळे विमानात चढण्‍यासाठी प्रवासी चालत जात असतांना माझ्‍या शेजारी चालत असलेली एक महिला एका व्‍यक्‍तीकडे निर्देश करून अगदी हळू आवाजात मला म्‍हणाली, ‘‘आम्‍ही पुष्‍कळ भाग्‍यवान आहोत. आमच्‍यासह बागेश्‍वर धामचे महाराज प्रवास करणार आहेत. त्‍यांच्‍या दर्शनासाठी सहस्रो लोक येतात आणि आता तर आम्‍ही त्‍यांच्‍या अगदी जवळ आहोत.’’ मी तोपर्यंत यापूर्वी पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री यांच्‍याविषयी कधीच ऐकले नव्‍हते; परंतु मी घरी आल्‍यावर मी काढलेले छायाचित्र माझ्‍या शेजारी रहाणार्‍या महिलेला दाखवले. तेव्‍हा तिने ‘तुमचे कर्म खरोखरच चांगले होते. त्‍यामुळे तुम्‍ही त्‍यांचा वैयक्‍तिकरित्‍या भेटू शकला. त्‍यांच्‍या ध्‍वनीचित्रफिती बघायला मला आवडतात’, असा अभिप्राय व्‍यक्‍त केला.

१. पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री यांच्‍याविषयी प्रसिद्धीमाध्‍यमे आणि नास्‍तिकतावादी संघटना यांच्‍याकडून अपप्रचार !

त्‍यानंतर ऑगस्‍ट २०२२ नंतर काही मासांनी या युवा स्‍वामींनी जवळजवळ ३०० ख्रिस्‍ती व्‍यक्‍तींना पुन्‍हा हिंदु धर्मात (घरवापसी) आणल्‍याविषयी प्रसिद्धी मिळाली. जेव्‍हा ख्रिस्‍ती मिशनरी लाखो हिंदूंचे नियमितपणे धर्मांतर करत असतात, तेव्‍हा त्‍याला प्रसिद्धीमाध्‍यमांनी आक्षेप घेतलेला क्‍वचित्‌च पहायला मिळतो; परंतु याच प्रसिद्धीमाध्‍यमांकडून ‘घरवापसी’ करणे, हे वादग्रस्‍त असे चित्र उभे केले जाते. खरे म्‍हणजे हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे, हे प्रसिद्धीमाध्‍यमांनी दाखवले पाहिजे. यानंतर लगेच अंधश्रद्धांच्‍या विरोधात काम करणारी एक संघटना आश्‍चर्यकारक शक्‍तींच्‍या असलेल्‍या पंडित धीरेंद्र शास्‍त्री यांच्‍या मागे लागली. त्‍यांनी पोलिसांकडे तक्रारही प्रविष्‍ट केली; परंतु या तक्रारीत काही तथ्‍य न सापडल्‍याने ती मागे घेण्‍यात आली. प्रसिद्धीमाध्‍यमांनी बातम्‍या देतांना चुकीचे मथळे देऊन ‘धीरेंद्र शास्‍त्री हे स्‍वतःला हनुमानाचे भक्‍त म्‍हणवून त्‍यांच्‍याकडे हनुमानाची शक्‍ती आहे’, असे म्‍हणत असले, तरी ते ‘स्‍वयंघोषित ईश्‍वर आहेत’, असा अपप्रचार करण्‍याचा प्रयत्न केला.

मारिया वर्थ

२. पंडित धीरेंद्र शास्‍त्री यांना विरोध करणार्‍या राजकारण्‍यांच्‍या मनात भीती !

जून २०२३ मध्‍ये धीरेंद्र शास्‍त्री यांनी बिहारमध्‍ये हनुमान कथेचा कार्यक्रम घोषित केला, तेव्‍हा बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार ते तेजस्‍वी यादव या राजकारणी लोकांनी या कार्यक्रमाला विरोध करून शास्‍त्री यांचे चारित्र्य डागाळण्‍याचा प्रयत्न केला. एवढे असूनही २७ वर्षीय धीरेंद्र शास्‍त्री यांना बिहारमध्‍ये अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्‍यांची कथा ऐकण्‍यासाठी जवळजवळ १० लाख लोकांचा समुदाय उपस्‍थित होता. या वेळी धीरेंद्र शास्‍त्री यांनी ‘ज्‍या लोकांनी पहिल्‍या दिवशी कथा ऐकली आहे, त्‍यांनी दुसर्‍या दिवशी न येता इतर लोकांना ऐकण्‍याची संधी द्यावी’, असे आवाहन लोकांना केले. मी त्‍यांच्‍या कथेचा कार्यक्रम वाहिनीवरून पाहिला. ते रहात असलेल्‍या हॉटेलसमोरही लोकांनी पुष्‍कळ गर्दी केली. यामुळे धीरेंद्र शास्‍त्री यांना तीव्रपणे विरोध करणार्‍या राजकारण्‍यांच्‍या मनात भीती निर्माण झाली असेल.

३. धीरेंद्र शास्‍त्री यांची विशेषता काय आहे ?

ज्‍या लोकांची श्रद्धा हेतूपुरस्‍सरपणे किंवा नकळतपणे खालच्‍या पातळीवर गेली आहे, त्‍या हिंदूंना जागवण्‍याचे कार्य धीरेंद्र शास्‍त्री करत आहेत. हिंदूंची श्रद्धा न्‍यून लेखण्‍यामध्‍ये हिंदु नावे धारण करणार्‍या लोकांचा समावेश आहे. प्राचीन असलेल्‍या हिंदु धर्माच्‍या बाजूने ठामपणे उभे रहाणारे कुणीतरी असावे, अशी सर्वसाधारण हिंदूंची उत्‍कट इच्‍छा होती. याखेरीज धीरेंद्र शास्‍त्री यांच्‍याकडे आध्‍यात्मिक शक्‍तीही आहे. राजकारण्‍यांची पर्वा न करता सत्‍याशी अगदी जवळ असलेल्‍या आणि इतर धर्मांपेक्षा मानवतेसाठी अधिक लाभदायी असलेल्‍या हिंदु धर्माविषयी बोलणारे कुणीतरी असावे, अशी समस्‍त हिंदूंची इच्‍छा होती. ‘त्‍यांच्‍याकडे येणार्‍या व्‍यक्‍तींनी त्‍यांची समस्‍या सांगण्‍यापूर्वीच त्‍या ओळखण्‍याची असलेली अद़्‍भुत शक्‍ती आणि ती समस्‍या सोडवण्‍याविषयी त्‍यांच्‍या आशीर्वादाचे सामर्थ्‍य हे सर्व हनुमानाच्‍या कृपेनेे होत आहे’, असा दावा ते करतात. त्‍यामुळेच त्‍यांना आता सर्वत्र प्रसिद्धी मिळाली आहे.

४. पंडित धीरेंद्र शास्‍त्री ‘हिंदु राष्‍ट्र’ आणि ‘घरवापसी’ यांविषयी उघड उघड करत असलेले कार्य !

पंडित धीरेंद्र शास्‍त्री हे ‘भारत हिंदु राष्‍ट्र होते, आता आहे आणि पुढेही हिंदु राष्‍ट्र राहील’, असे स्‍पष्‍टपणे बोलत आहेत अन् अधिकृतरित्‍या ‘भारत हे हिंदु राष्‍ट्र व्‍हावे’, अशी मागणी करत आहेत. याखेरीज ‘भारतावर आक्रमण करणार्‍यांमुळे ज्‍या हिंदूंनी इस्‍लाम आणि ख्रिस्‍ती धर्म स्‍वीकारला आहे, त्‍यांनी घरवापसी करावी’, असे आवाहन करत आहेत. बिहारनंतर गुजरातमधील कथेच्‍या वेळी त्‍यांनी तेथील आदिवासी लोकांना ‘केवळ प्रभु श्रीराम आणि हनुमान यांची कथा ऐकण्‍यासाठी येऊ नका. प्राचीन परंपरा असलेल्‍या स्‍वगृही परत या’, असे आवाहन केले. या ठिकाणी ख्रिस्‍ती मिशनर्‍यांनी आदिवासींना जीवनावश्‍यक वस्‍तू भेट देऊन आणि नरकाची भीती दाखवून पुष्‍कळ प्रमाणात शिरकाव केला आहे. त्‍यामुळे असे आवाहन करणे सार्थ आहे; परंतु ध्‍वनीचित्रकाच्‍या समोर आतापर्यंत असे आवाहन कुणी केलेले नव्‍हते. जे मूळ हिंदु धर्मातील आहेत आणि जे विस्‍तारवादी धर्मांचा झालेला नकारात्‍मक परिणाम जाणतात, ते आतापर्यंत काहीच बोलत नाहीत, हे विचित्र वाटते. अनेक महत्त्वाच्‍या कारणांसाठी हिंदु धर्म हा श्रेष्‍ठ आहे, याची कारणे मी माझ्‍या अन्‍य एका लेखामध्‍ये दिली आहेत. तसेच ‘ख्रिस्‍ती आणि मुसलमान राष्‍ट्रांपेक्षा हिंदु राष्‍ट्र हे अधिक चांगले आहे’, हे मी माझ्‍या अन्‍य एका लेखामध्‍ये लिहिले आहे. तरीही ज्‍यांचे पुष्‍कळ अनुयायी आहेत, अशा जागतिक स्‍तरावर प्रसिद्ध असलेल्‍या स्‍वामींनी अशा प्रकारचे आवाहन केलेले नाही. याउलट ‘काही वेळा ख्रिस्‍ती अजून चांगले ख्रिस्‍ती कसे होतील किंवा मुसलमान अजून चांगले मुसलमान कसे होतील’, यासाठी ते प्रोत्‍साहन देतात. ‘या धर्मांमध्‍ये कट्टरता असणे’, हा हिंदु धर्मासाठी अधिक धोकादायक आहे, हे त्‍यांच्‍या लक्षात येत नाही; कारण या लोकांचा धर्म त्‍यांना हिंदूंचा तिरस्‍कार करण्‍यास शिकवतो. बायबल आणि कुराण या ग्रंथांनुसार हिंदु हे ‘काफीर’ (अल्लाला न मानणारे) आहेत. हिंदु धर्मातील स्‍वामी धर्मांतरित झालेल्‍यांना ‘पुन्‍हा हिंदु धर्मात या’, असे सांगायला मागे-पुढे का होतात ? त्‍यांच्‍यावर अजून वसाहतवादी मानसिकतेचा प्रभाव आहे का ? किंवा असे आवाहन करणे ‘सेक्‍युलॅरिझम्’च्‍या (धर्मनिरपेक्षतेच्‍या) विरोधात आहे, याची त्‍यांना भीती वाटत आहे का ?

५. इस्‍लाम आणि ख्रिस्‍ती यांच्‍याकडून केली जाणारी बळजोरी अन् हिंदु धर्माची महानता !

दुर्दैवाने भारत स्‍वतंत्र झाल्‍यावर येथील राजकारण आणि शैक्षणिक अभ्‍यासक्रम हा हिंदु परंपरांपेक्षा अन्‍य धर्मांना पूरक आहे. स्‍वतंत्र भारतात कॉन्‍व्‍हेंट शाळांना शिकवण्‍यास अनुमती दिली गेली. कदाचित् हिंदु शासनकर्त्‍यांना हे ठाऊक नाही की, ख्रिस्‍ती शिक्षक हिंदु धर्माचा तिरस्‍कार करतो आणि तो त्‍याविषयीचा संदेश छुपेपणाने हिंदु विद्यार्थ्‍यांपर्यंत पोचवतो. ‘हिंदु धर्म म्‍हणजे काय ?’, यावर प्रवचने किंवा चर्चा अधिक प्रमाणात होतांना दिसत नाहीत. वेदांमधील ‘या जगात दिसणार्‍या विविध गोष्‍टी या तात्‍पुरत्‍या असून अनंत असलेले ब्रह्म म्‍हणजे शुद्ध आनंद आहे’, या गहन तत्त्वज्ञानाविषयी चर्चा होत नाही. वेदांनी केवळ पाश्‍चिमात्‍य तत्त्वज्ञानी लोकांना प्रेरणा दिलेली नाही, तर भौतिकशास्‍त्राचा अभ्‍यास करणार्‍या शास्‍त्रज्ञांनाही प्रेरणा दिली आहे. तरीही भारतीय विद्यार्थ्‍यांना ‘हिंदु धर्म हा अब्राह्मिक (ब्रह्म न मानणारे म्‍हणजेच इस्‍लाम, ख्रिस्‍ती आणि ज्‍यू) धर्मांपेक्षा हीन आहे’, असे शिकवले जाते. इथे फसवणूक करून केलेली धर्मांतरे खपवून घेतली जातात.

जसजसे अधिकाधिक हिंदु स्‍वधर्माविषयी निष्‍काळजीपणा करू लागले, तसतसे मानवी धर्मासाठी असलेले हिंदु धर्माचे महत्त्व न्‍यून होत गेले आणि काही जण तर धर्मही विसरले. ते केवळ देवतांची पूजा करत राहिले आणि अब्राह्मिक धर्म जे सांगतात त्‍यावर विश्‍वास ठेवत राहिले; परंतु आता सध्‍याच्‍या काळात हिंदूंमध्‍ये पालट होत आहे आणि यामध्‍ये हिंदु युवकांचा समावेश आहे. विभाजन करणार्‍या आणि तर्कहीन मानसिकता असणार्‍या इतर धर्मांतील उणिवा त्‍यांच्‍या लक्षात येऊ लागल्‍या आहेत. इतर धर्म सांगतात, ‘एक तर तुम्‍ही आमच्‍या देवावर विश्‍वास ठेवा, नाही तर तुम्‍ही अनंत काळ नरकात रहा’. याउलट सर्वसमावेशक असलेला हिंदु धर्म सांगतो, ‘देवाच्‍या उद्यानात वेगवेगळी फुले आहेत आणि देवापर्यंत जाण्‍याचे वेगवेगळे रस्‍ते आहेत. तो कुणालाही नरकात जाऊ देत नाही.’ वास्‍तविक सर्वजण देवामध्‍येच सामावले आहेत आणि प्रत्‍येकाला जन्‍मोजन्‍मी संधी दिली जाणार आहे. भारत हे ‘ख्रिस्‍ती राष्‍ट्र’ व्‍हावे’, यासाठी ख्रिस्‍ती, तर मुसलमान संघटना भारताला ‘इस्‍लामी राष्‍ट्र’ बनवण्‍याचे नियोजन करत आहेत. ते स्‍वतःचा धर्म हिंदूंवर लादण्‍याचा त्‍यांचा हेतू आहे; कारण ‘त्‍यांच्‍या देवाचा तो हुकूम आहे’, असा त्‍यांचा विश्‍वास आहे. ‘इतर धर्मीय त्‍यांच्‍या धर्माच्‍या संस्‍थापकाने सिद्ध केलेला धर्म पाळावा, असे सृष्‍टीच्‍या निर्मात्‍याला वाटते’, असा दावा ते करतात (याचा कोणताही पुरावा नाही) आणि ‘जर त्‍यांनी धर्म पाळला नाही, तर सृष्‍टीचा निर्माता त्‍यांना नरकात ढकलेल’, असा त्‍यांचा विश्‍वास आहे. ‘प्राचीन हिंदु धर्म कोसळेल’, असा आधारहीन दावा करणार्‍यांना आव्‍हान देण्‍याची आवश्‍यकता आहे.

६. पंडित धीरेंद्र शास्‍त्री करत असलेले कार्य काळाला पूरक !

‘आमचा निर्माता असलेला ईश्‍वर आपल्‍यापैकी कोट्यवधी लोकांना नरकात ढकलून एखाद्या पुस्‍तकावर विश्‍वास ठेवणार्‍यांना वाचवतो’, हे कसे शक्‍य आहे ? याखेरीज ख्रिस्‍ती आणि इस्‍लाम या धर्मांच्‍या बायबल किंवा कुराण या धर्मग्रंथांपैकी कोणता ग्रंथ नरकापासून वाचवेल ? हे या धर्मांनी ठरवलेले नाही. असे असले, तरी भारत आणि इतर जग अशा स्‍थितीला आले आहे की, आता हिंसाचार अन् नैतिक अधःपतन या दुष्‍टचक्रातून वाचण्‍यासाठी हिंदु धर्माला बळकटी आणणे तातडीने आवश्‍यक आहे. नाही तर ख्रिस्‍ती आणि इस्‍लाम धर्माचे पृथ्‍वीवरून हिंदु धर्म नष्‍ट करण्‍याचे ध्‍येय साध्‍य होईल अन् ते सर्व मानवजातीसाठी धोकादायक ठरेल. त्‍यामुळे भारतातील हिंदू टिकून रहाण्‍यासाठी जे धर्मांतरित आहेत, त्‍यांनी त्‍यांचा धर्म सोडून हिंदु धर्मात घरवापसी करणे आवश्‍यक आहे. त्‍यामुळे पंडित धीरेंद्र शास्‍त्री हिंदु राष्‍ट्र आणि घरवापसी यांसाठी करत असलेले आवाहन हे काळाला धरून शुद्ध हवेत श्‍वास घेतल्‍याप्रमाणे योग्‍य आहे. असे असले, तरीही अजून एक प्रश्‍न सोडवण्‍याची आवश्‍यकता आहे. ऋषींनी मिळवलेले ज्ञान पुन्‍हा सर्वसामान्‍य लोकांपर्यंत गेले पाहिजे. ‘हिंदु धर्म हा खरोखरच श्रेष्‍ठ आहे’, हे जेव्‍हा स्‍पष्‍ट होईल, तेव्‍हा  धर्मांतरित झालेल्‍यांना परत येण्‍याची इच्‍छा होईल. पंडित धीरेंद्र शास्‍त्री हेच कार्य करत आहेत.

७. पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री यांच्‍या विरोधात षड्‍यंत्र रचले जाण्‍याची शक्‍यता !

‘सत्‍याच्‍या शोधात असलेल्‍या आपल्‍यावर माया कशा प्रकारे आवरण आणते ?’, हे ते अगदी सोप्‍या शब्‍दात सांगत आहेत. हिंदु धर्मात सर्वश्रेष्‍ठ असे ज्ञान आहे, ‘विशेषतः प्रत्‍येकाचा आत्‍मा अनंत अशा ईश्‍वर किंवा ब्रह्माशी एकरूप होतो’, असे हिंदु तत्त्वज्ञान सांगते. जे मानवजातीवर नियंत्रण ठेवू इच्‍छितात, त्‍यांना हे ज्ञान सर्वसाधारण माणसांपर्यंत गेलेले नको आहे; कारण ‘त्‍याला ज्ञान झाले, तर तो भीतीपासून मुक्‍त होईल आणि नियंत्रणात रहाणार नाही’, असे त्‍यांना वाटते. अशा लोकांकडे पुष्‍कळ शक्‍ती आहे, तसेच मुख्‍य प्रसिद्धीमाध्‍यमे त्‍यांच्‍या मुठीत आहेत. त्‍यामुळे या युवा स्‍वामींच्‍या विरोधात खोटे आरोप पसरवले जाऊ शकतात. असा अन्‍याय होणारे ते एकमेव नाहीत. ‘स्‍वामी विवेकानंद यांना अमेरिकेत त्‍यांच्‍या विरोधात झालेला खोटा प्रचार सहन करावा लागला होता. हनुमानाच्‍या कृपेने तसे काही होणार नाही आणि पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री अनंत अशा हिंदु धर्माचा प्रचार करण्‍यास यशस्‍वी होतील’, अशी आशा आपण करूया.

लेखिका : मारिया वर्थ