गोव्यातील खाणी लवकरच चालू होणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

राज्यातील खाण व्यवसाय पुन्हा चालू होणार !

पणजी, १२ जुलै (वार्ता.) – गोव्यातील खनिज खाणी लवकरच चालू होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. गोवा सरकारने हल्लीच पाच खाण क्षेत्रांसाठी (ब्लॉकसाठी) निविदा काढल्या होत्या. या निविदा जिंकलेल्या ५ खाण व्यावसायिकांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १२ जुलै या दिवशी ‘लेटर ऑफ इंटेंट’ सुपुर्द केले. याप्रसंगी बोलतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. यावेळी खाण खात्याचे संचालक डॉ. सुरेश शानभाग उपस्थित होते.

 (सौजन्य : Prudent Media Goa)

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वेळी खाण ‘ब्लॉक’च्या निविदा जिंकलेल्यांना खाणी चालू करण्यासंबंधी आवश्यक सर्व अनुज्ञप्ती (परवाना) लवकरात लवकर घेण्यास सांगितले असून यासाठी केंद्र आणि गोवा सरकार सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे. खात्याचे संचालक डॉ. सुरेश शानभाग म्हणाले, ‘‘अन्य खाण ‘ब्लॉक’ची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्यांची ११ ऑगस्टपासून एकेक करून जनसुनावणी होणार आहे, तसेच अन्य ४ खाण ‘ब्लॉक’साठीही निविदा काढली जाणार आहे.’’