आवश्यक कागदपत्रांविषयी विचारल्यावर वाद !
मडगाव, २६ जून (वार्ता.) – रुमडामळ येथे एक आठवड्यापूर्वी रुमडामळ परिसरातील अनधिकृत मदरशाच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर पंचसदस्य विनायक वळवईकर यांच्यावर धर्मांधांकडून प्राणघातक आक्रमण करण्यात आले होते. यानंतर संवेदनशील रुमडामळ येथे हिंदु-मुसलमान यांच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेला आठवडा पूर्ण होत असतांनाच २५ जून या दिवशी रात्री रुमडामळ येथील बंद करण्यात आलेले एक गोमांसविक्री दुकान उघडे करण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या एका दुकानमालकाला ‘तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे आहेत का ?’ याविषयी विचारल्यावर दोघांमध्ये वाद होऊन पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले.
(सौजन्य : Prudent Media Goa)
पंचसदस्यावर प्राणघातक आक्रमण झालेल्या दिवशी जमावाने अनधिकृत मदरसा आणि गोमांस विक्रेता यांच्या दुकानांवर दगडफेक केली होती. काही गोमांस दुकानांचे फलकही फाडण्यात आले होते. यानंतर परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांच्या मध्यस्थीने रुमडामळ येथील काही गोमांस दुकाने बंद करण्यात आली होती. बंद करण्यात आलेल्या एका दुकानातील गोमांस विक्रेत्याने २५ जूनच्या रात्री सुमारे ९ वाजता दुसर्या दिवशी दुकान उघडण्यासाठी दुकानात डागडुजीचे काम चालू केले. या वेळी तेथे दुचाकीवर आलेल्या एका व्यक्तीने ‘तुमच्याकडे अन्न आणि औषध प्रशासनाची अनुज्ञप्ती आहे का ?’, असा प्रश्न दुकानमालकाला केला. यानंतर संबंधित व्यक्ती आणि दुकानमालक यांच्यामध्ये वाद झाला. यानंतर दुकानमालकाने त्याच्या सहकार्यांना एकत्र करून रुमडामळ पोलीस चौकी गाठून संबंधित व्यक्तीच्या विरोधात पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी उपस्थिती लावून परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.
संपादकीय भूमिकाअनधिकृत गोमांस विक्री दुकान पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न करणार्याला वेळीच रोखणार्या रुमडामळ येथील जागरूक नागरिकाचे अभिनंदन ! |