‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अनमोल शिकवण (खंड १) ‘साधना प्रत्यक्ष शिकवण्याच्या पद्धती’ हा ग्रंथ हातात घेतल्यावर ‘हा ग्रंथ म्हणजे प्रत्यक्ष भगवद्गीता आहे’, असे जाणवणे !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अनमोल शिकवण (खंड १) ‘साधना प्रत्यक्ष शिकवण्याच्या पद्धती’ हा ग्रंथ हातात घेतल्यावर ‘हा ग्रंथ आहे’, या भावानेच मी तो हातात घेतला; मात्र प्रत्यक्षात ‘ही ‘श्रीमद्भगवद्गीता’ आहे’, असे मला वाटले. या ग्रंथातून प्रचंड प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत आहे. हा ग्रंथ हातात घेतल्यावर ‘ग्रंथ वाचतच राहूया. तो खाली ठेवावा’, असे वाटत नाही, इतका तो सुंदर आहे.’ – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.६.२०२३)