निवडणुकीमध्ये लव्ह जिहाद, गोहत्याबंदी यांसाठी कार्य करणार्‍या उमेदवारांना त्यांची जातपात न पाहता निवडून देणे आवश्यक ! – मुन्ना कुमार शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय हिंदू महासभा, नवी देहली

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव – सप्तम दिवस : मान्यवरांचे विचार

रामनाथी (फोंडा), २२ जून (वार्ता.) – जोपर्यंत या देशात हिंदु बहुसंख्य रहातील, तोपर्यंत हा देश सुरक्षित राहील. हिंदू अल्पसंख्य झाल्यास भारताचेही तुकडे होतील. जेथे मुसलमान बहसंख्य झाले, तेथे हिंदूंना पलायन करावे लागत आहे. त्यामुळे हिंदू सुरक्षित राहिले, तर भारतासह विश्‍वही सुरक्षित राहील. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राज्यघटनेमध्ये ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) हा शब्द अंतर्भूत केला. तेव्हापासून या देशात हिंदु धर्माला शिव्या घालणार्‍यांना ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘सुशिक्षित’ म्हटले जाते, तर हिंदूंच्या रक्षणार्थ लढणार्‍यांना ‘भगवा आतंकवादी’ म्हटले जाते. येत्या निवडणुकीमध्ये  लव्ह जिहाद, गोहत्याबंदी यांसाठी कार्य करणार्‍या उमेदवारांना त्याची जातपात न पाहता निवडून दिले पाहिजे. एक दिवस या देशात हिंदु राष्ट्र येईल, तेव्हा आपले राष्ट्र जगभरात बलवान होईल. त्यामुळे आपल्याला सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या साहाय्याने भारताला हिंदु राष्ट्र करण्यासह संपूर्ण विश्‍वाला हिंदुमय करायचे आहे, असे वक्तव्य नवी देहली येथील अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष मुन्ना कुमार शर्मा यांनी वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या वेळी केले.

श्री. मुन्ना कुमार शर्मा

भारताची ८५ टक्के लोकसंख्या हिंदू आहे. त्यामुळे हे हिंदूंचे राष्ट्र आहे. तरीही या देशात गोमाता आणि हिंदु महिला सुरक्षित नाहीत. पूर्वी देशात हिंदु राजांची निरनिराळी संस्थाने होती, तरीही ते हिंदु राष्ट्र होते. जेव्हा या देशावर परकीय मुसलमान आक्रमकांचे शासन आले, तेव्हापासून हिंदूंवर अत्याचार चालू झाले. त्यानंतर इंग्रजांनीही तेच केले. जेव्हा हिंदु राजा आणि संस्थानिक यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला, तेव्हा इंग्रजांनी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला.

लव्ह जिहाद, लँड जिहाद, गोहत्या, धर्मांतर अशा विविध क्षेत्रात काम करणार्‍या अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना देशभर कार्यरत आहेत. अशा संघटनांना एका व्यासपिठावर आणून त्यांना विविधत प्रशिक्षण देणाचे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे. अशी समिती आणि त्यांचे प्रेरणास्थान परमपूज्य डॉ. जयंत आठवले यांना सादर नमन आहे. – मुन्ना कुमार शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय हिंदू महासभा