‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राला बळी पडलेल्या मुलींना सोडवण्यासाठी दक्षता समित्यांची स्थापना करणे आवश्यक ! – अधिवक्ता शैलेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालयाचे गोवा खंडपीठ, गोवा.

अधिवक्ता शैलेश कुलकर्णी

रामनाथी, २१ जून (वार्ता.) – देशात लव्ह जिहादच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. यासाठी धर्मांध तरुण हिंदु असल्याचे सांगून हिंदु मुलींशी परिचय वाढवतात. त्यानंतर एक दिवस तिच्याशी लग्न करतात. त्या मुलीवर आधीच वशीकरण केलेले असल्याने ती त्याला सोडून जात नाही आणि तो सांगेल, त्याप्रमाणे वागायला लागते. तिने तसे न केल्यास तिला पुष्कळ मारहाण केली जाते. एक दिवस तिचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते. अशा प्रकारे ‘लव्ह जिहाद’ मध्ये अडकलेल्या मुलींना सोडवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी दक्षता समिती स्थापन केल्या पाहिजेत, असे मत गोवा येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठाचे अधिवक्ता शैलेश कुलकर्णी यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या सहाव्या दिवशी (२१.६.२०२३ या दिवशी) व्यक्त केले.

या वेळी अधिवक्ता शैलेश कुलकर्णी यांनी लव्ह जिहादच्या षड्यंत्राला बळी पडलेल्या गोवा येथील एका हिंदु मुलीची कशी सुटका केली, याचा स्वानुभव कथन केला. त्यांनी सांगितले, ‘‘गोवा येथील एक हिंदु मुलगी पुणे येथे नोकरीनिमित्त असतांना एका धर्मांध तरुणाने हिंदु बनून तिच्याशी परिचय वाढवला आणि नंतर तिच्याशी लग्न केले. त्यानंतर मुसलमान बनण्यासाठी तिच्यावर दबाव निर्माण केला. त्यासाठी तिला पुष्कळ मारहाण केली. नंतर तिने हिजाब, बुरखा आणि काळे कपडे परिधान करणे चालू केले. धर्मांधाने तिला ‘धर्मांतर केले नाही, तर तुला मारून टाकेन’, अशी धमकीही दिली. तिने ती संकटात असल्याविषयी मैत्रिणीच्या माध्यमातून वडिलांना संदेश (मॅसेज) पाठवला. अर्थात तिच्या वडिलांनी हे प्रकरण मला दिले. त्यानंतर मी तिच्या वडिलांसह कोथरुडला गेलो. पीडितेच्या घरी जाण्यापूर्वी पुणे येथील बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांच्या कार्यकर्त्यांना कळवले. या कामासाठी त्यांनी २५० कार्यकर्ते साहाय्याला दिले. यासमवेतच पुणे पोलिसांना कळवले असल्याने तेही समवेत होते. प्रारंभी मुलीने आमच्या समवेत येण्यास नकार दिला; पण नंतर तिला घेऊन आम्ही स्थानिक पोलीस ठाण्यात गेलो. तेथे तिला विश्वासात घेतले. तेव्हा तिने पोलिसांना सर्व माहिती दिली. मुलीने लिहून देतांना ‘ती त्याच्यासमवेत स्वत:हून गेली’, असे सांगितले आणि त्याच्याविरुद्ध कोणतीही तक्रार करण्यास नकार दिला. यावरून ‘द केरला स्टोरी’ आपल्या घरापर्यंत पोहोचली आहे’, असे लक्षात येते. हे थांबवण्यासाठी ‘पापा, प्लिज हेल्प मी’ (बाबा, मला मदत करा) अशीही चळवळ राबवू शकतो.’’