हिंदुद्वेषी आणि मुसलमान अन् ख्रिस्तीप्रेमी काँग्रेस सरकारचा निर्णय !
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील काँग्रेस सरकारने पूर्वीच्या भाजप सरकारने केलेला धर्मांतर प्रतिबंधक कायदा रहित करण्याचा निर्णय घेतला. ३ जुलैपासून प्रारंभ होणार्या विधीमंडळ अधिवेशनात यासंबंधी एक विधेयक मांडले जाणार आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये भाजप सरकारने हा कायदा केला होता. या कायद्यात बळजोरी, लालूच देणे, पदाचा अपवापर करणे किंवा फसवणुकीतून धर्मांतर करण्याच्या विरोधात कडक कारवाईची तरतूद आहे. यात ३ ते ५ वर्षांपर्यंतचा कारावास आणि २५ सहस्र रुपये दंड अशी शिक्षा आहे.
कर्नाटक में रद्द होगा धर्मांतरण विरोधी कानून, किताबों से हटेंगे हेडगेवार-सावरकर से जुड़े चैप्टर #karnataka #AntiConversionLaw #textbooks #hedgewar #savarkarhttps://t.co/tHBcdvDj4M
— AajTak (@aajtak) June 15, 2023
संपादकीय भूमिकाराज्यांमधील असे कायदे जरी रहित झाले, तरी केंद्रीय स्तरावर धर्मांतरविरोधी कायदा करण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने असा कायदा तात्काळ करून हिंदूंचे रक्षण करावे, असेच हिंदूंना वाटते ! |
हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील धडे अभ्यासातून काढणार !
६ वी ते १० वीपर्यंत कन्नड आणि सामाजिकशास्त्र याविषयांच्या पुस्तकांमध्ये पालट करण्यालाही मंत्रीमंडळाच्या बैठकीत संमती देण्यात आली आहे. यानुसार रा.स्व. संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील धडे वगळण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी यांना नेहरूंचे पत्र तसेच डॉ. आंबेडकर यांच्यावरील कविता समाविष्ट करण्यात येणार आहे.
तसेच राज्यातील सरकारी आणि खासगी अशा सर्व शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये राज्यघटनेची प्रस्तावना शिकवणे अनिवार्य करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकासंघद्वेषी आणि सावरकरद्वेषी काँग्रेस ! |