अमेरिकेमुळे ऑस्ट्रेलियात आयोजित ‘क्वाड’ देशांची बैठक लांबणीवर !

पंतप्रधान मोदी होणार होते सहभागी !

(भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या ४ देशांचा ‘क्वाड’ गट हा संरक्षणात्मकदृष्ट्या धोरणात्मक संबंध सुदृढ करण्यासाठी बनवलेला गट आहे.)

‘क्वाड’ गटात सहभागी देश( अमेरिका,जपान, भारत आणि ऑस्ट्रेलिया)

सिडनी (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बानीज यांनी ‘क्वाड’ गटाची पंतप्रधानस्तरीय बैठक लांबणीवर ढकलल्याचे घोषित केले आहे. यामागे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे उपस्थित राहू शकणार नसल्याचे कारण देण्यात येणार आहे. भारत आणि जपान यांच्या पंतप्रधानांनी यास अनुमोदन दिल्याचेही अल्बानीज यांनी स्पष्ट केले. अमेरिकेत कर्जामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर उपाय काढण्यामध्ये बायडेन व्यस्त असल्याने त्यांनी त्यांचे पुढील आठवड्यात असलेले विदेश दौरे रहित केले आहेत.