सातत्याने शिकण्याच्या स्थितीत असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासमवेत पंडित सतीश शर्मा

जागतिक कीर्तीचे ज्योतिषी तथा वास्तूविशारद पंडित सतीश शर्मा आणि त्यांची पत्नी सौ. पद्मा यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना त्यांच्या कार्याविषयी निरनिराळी माहिती दिली. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी ती अत्यंत जिज्ञासेने ऐकली. त्यांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यासह पंडित सतीश शर्मा त्यांचे काम साधना म्हणून कशा प्रकारे करू शकतात, त्यातून ते ईश्वरप्राप्तीच्या दिशेने कशी वाटचाल करू शकतात, याविषयी मार्गदर्शनही केले.