आरोपी रसूल इब्राहिम सोळंकी याच्यावर कठोर कारवाईचे निर्देश

उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांची माहिती !

डॉ. नीलम गोर्‍हे

पालघर – येथे ८ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करणार्‍या आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करा, असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी दिले आहेत. या घटनेतील आरोपी रसूल इब्राहिम सोळंकी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आरोपीचे किराणा मालाचे दुकान असून खाऊ देण्याच्या निमित्ताने त्याने मुलीला दुकानात नेले. तिथे त्याने तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. याविषयी तिने आई-वडिलांना सांगितले. त्यानंतर आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे म्हणाल्या, ‘‘आरोपीचे हे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे आहे. अशा नराधमावर कठोर कारवाई करण्यात यावी.’’ यासंदर्भात उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना निर्देश दिले आहेत की, घटनेचे अन्वेषण जलदगतीने करून आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी. ‘आरोपीला जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न करावेत आणि पीडित मुलीचे समुपदेशन अन् शालेय शिक्षण चालू रहाण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.’’