संघाच्या शाखांमध्ये महिलांना प्रवेश देण्याविषयी होऊ शकतो निर्णय !

चंडीगड येथे रा.स्व.संघाच्या ३ दिवसांच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला प्रारंभ

चंडीगड – येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधि सभेला ३ दिवसांची बैठक १२ मार्चपासून प्रारंभ झाला. या बैठकीत संघाच्या शाखांद्वारे महिलांना जोडण्याविषयी चर्चा होणार आहे. आतापर्यंत शाखांमध्ये महिलांचा समावेश केला जात नव्हता. संघाकडून दुर्गावाहिनीसारखी संघटना महिलांसाठी कार्यरत आहे. त्यामुळे आता थेट संघाच्या शाखेत महिलांना प्रवेश देण्यावर निर्णय घेतला जाऊ शकतो. यासह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३०० वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने देशभर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या सूत्रावर या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीला प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे उपस्थित आहेत.