मी ‘ब्राह्मण’ नव्हे, तर ‘पंडित’ असा शब्द उच्चारला ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

सरसंघचालकांच्या विधानावरून वाद झाल्याचे प्रकरण

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

भागलपूर (बिहार) – मी ‘ब्राह्मण’ शब्द उच्चारला नाही. मी ‘पंडित’ असा शब्द उच्चारला. जो बुद्धीमान असतो, त्याला ‘पंडित’ म्हणतात, असा खुलासा प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी ब्राह्मणांविषयी केलेल्या वक्तव्यावर केला. या वेळी ‘वादाशी संबंधित अनावश्यक विषयांवर चर्चा करण्याऐवजी राष्ट्र उभारणीविषयी बोलल्यास फार चांगले होईल’, असेही ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका कार्यक्रमात सरसंघचालकांनी ‘जात ही देवाने निर्माण केलेली नाही, जात पंडितांनी निर्माण केली आहे, जे चुकीचे आहे’, असे विधान केले होते. त्यावर वाद झाला होता.