पुणे येथील ‘प्रसाद प्रकाशन’चा अमृत महोत्सवी सांगता समारंभ
पुणे – सरस्वतीदेवी आहे कि नाही ? हा प्रश्न सध्या उपस्थित केला जातो; पण जग विश्वासावर चालते. मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे की, जो स्वतः विश्वास ठेवतो आणि दुसर्यांना विश्वास ठेवायला लावतो. श्रद्धा ठेवतोही आणि ती ठेवायलाही लावू शकतो. आपल्याला सगळे जीवन सुखमय हवे असते; पण सुख कशात आहे याविषयी दोन वेगळ्या विचारधारा आहेत. सगळ्या जगाची धारा एक आणि भारताची वेगळी आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ८ जानेवारी या दिवशी व्यक्त केले. ‘प्रसाद प्रकाशन’च्या अमृत महोत्सवी सांगता समारंभात ते बोलत होते. सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार, मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो.बं. देगलूरकर, प्रसाद प्रकाशनच्या संपादिका डॉ. उमा बोडस या वेळी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात प्रसाद प्रकाशनच्या संकेतस्थळाचे आणि ‘इंटरनेट रेडिओ’चे उद़्घाटन, तसेच १३ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
(सौजन्य : ABP MAJHA)
भारतीय संस्कृती अखंडपणे चालत असलेली संस्कृती आहे. जगात भारताएवढी एकही प्राचीन संस्कृती नाही, असे मत डॉ. देगलूरकर यांनी या वेळी व्यक्त केले.