तटबंदी पाडून वाढवण्यात आले आहे चंदनगडावर दर्ग्याचे अतिक्रमण !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संकेतस्थळावर लेखमालिका वाचा !

गड-दुर्ग यांना इस्लामची धार्मिक केंद्रे बनवून छत्रपती शिवरायांचा पराक्रम झाकोळण्याचे आणि हिंदूंना षंढ बनवण्याचे षड्यंत्र ओळखा !

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील गड-दुर्ग यांवर एखादे थडगे किंवा मजार बांधणे, तेथे ऊरूस चालू करणे आणि त्यानंतर दर्गा बाधून तेथे धार्मिक स्थळ निर्माण करणे असे प्रकार एका ठराविक पद्धतीनुसार चालू आहेत. गड-दुर्ग इस्लामची धार्मिक केंद्रे बनवून छत्रपती शिवरायांचा पराक्रम झाकोळून हिंदूंना तेजोहीन करण्याचे हे नियोजित षड्यंत्र असल्याचे दिसून येत आहे. सध्याचे महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील गड-दुर्ग यांवरील अतिक्रमण हटवण्याची केलेली घोषणा स्वागतार्ह आहे. या इस्लामिक अतिक्रमणाची भयावहता लक्षात यावी, यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’ मधून याविषयीची माहिती क्रमश: प्रसिद्ध करत आहोत. या गड-दुर्गांवरील अतिक्रमणही राज्यशासनाने हटवावे, अशी समस्त दुर्गप्रेमींची मागणी आहे.

(भाग ८)

(भाग ७. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/643450.html)

चंदनगड आणि वंदनगड हे जोडकिल्ले
(चित्रावर क्लिक करा)

सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये महादेव डोंगर नावाची एक शाखा आहे. यामध्ये चंदनगड आणि वंदनगड हे जोडलेले किल्ले आहेत. चंदनगड कोरेगाव तालुक्यातील बनवडी, तर वंदनगड वाई तालुक्यातील बेलमाची गावामध्ये येतो. चंदनगडावर दुर्मिळ असे ‘चंदनेश्वर महादेवा’चे मंदिर असून दगडी मिनार, दगडी चौथरा, दारूगोळा कोठार आदी वास्तू आहेत.

चंदनगडावर अवैधरित्या उभारण्यात आलेला ‘हजरत पीर दस्तगीर’ दर्गा
चंदनगडावरील दर्ग्यामध्ये असलेली मजार

चंदनगडावर ‘हजरत पीर दस्तगीर’ हा दर्गा आहे. या दर्ग्याची व्याप्ती अतिक्रमण करून, तसेच चंदनगड वनविभागाच्या जागेवर असूनही दर्ग्याचे बांधकाम अवैधरित्या वाढवण्यात आले आहे. या पुरातन किल्ल्यावर दर्ग्यात जाण्यासाठी पायर्‍या बांधण्यात आल्या आहेत. वीजेची व्यवस्था आणि सजावट करण्यात आली आहे. दर्ग्याच्या परिसरात निवासव्यवस्था, तसेच शौचालय आदी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. मंडपासाठी लोखंडी खांब उभे करण्यात आले आहेत. प्रतिवर्षी या ठिकाणी ‘चंदन-वंदन उरूस’ साजरा केला जातो. उरूसाच्या वेळी गडाच्या खालील बाजूस मांसाहाराचे जेवण सिद्ध केले जाते. एकीकडे प्रशासन या गडावरील पुरातन शिवमंदिराची डागडुजी करायला देत नाही, तर दुसरीकडे या दर्ग्याचा मात्र अवैधरित्या विस्तार करण्यात आला आहे.

(भाग ९. (अंतिम) वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/644053.html)