‘वर्ष २०२१ मध्ये एका ग्रंथाच्या सेवेच्या निमित्ताने मला पू. संदीप आळशी यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रंथासंदर्भातील सेवा करतांना त्यांनी मला दिलेले दृष्टीकोन पुढे दिले आहेत. त्यानुसार ‘साधना करून मला परात्पर गुरु डॉक्टरांचे मन जिंकता येऊ दे’, ही परात्पर गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना आहे.


१. इतरांनी आपले कौतुक केले, तर गुरूंची कृपा आहे आणि चुका सांगितल्या, तर शिकायला मिळाले’, असा दृष्टीकोन ठेवल्यास आत्मविश्वास वाढणे
एका हितचिंतकांनी लिहून दिलेल्या लिखाणाचा ग्रंथ छापायचा होता. ते लिखाण छापण्यापूर्वी त्या हितचिंतकांना संगणकावर ते लिखाण दाखवण्याची सेवा माझ्याकडे होती. ‘त्या हितचिंतकांना आपण केलेली (सनातन संस्थेच्या पद्धतीनुसार) लिखाणाची मांडणी त्यांना आवडेल का, ते काय म्हणतील ?’, असे अनेक प्रश्न माझ्या मनात होते. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी मला पू. संदीपदादा भेटले. तेव्हा मी पू. दादांना सहज म्हणाले, ‘‘पू. दादा, माझ्यासाठी प्रार्थना करा. मला भीती वाटते.’’ त्यावर पू. संदीपदादा मला म्हणाले, ‘‘असा विचार करू नकोस. त्यामुळे आत्मविश्वास न्यून होतो. ‘त्यांनी आपल्याला चांगले म्हटले किंवा त्यांना आवडले, तर गुरूंची कृपा आहे आणि त्यांना आवडले नाही किंवा त्यांनी काही सुधारणा, त्रुटी सांगितल्या, तर त्यातून आपल्याला शिकायला मिळाले’, असा दृष्टीकोन ठेव. त्यामुळे तुझा आत्मविश्वास वाढेल.’’
२. स्वतःची तुलना इतरांशी करू नये; कारण ‘समोरच्याने किती साधना केली आहे’, हे आपल्याला ठाऊक नसते !
एका सेवेत माझ्याकडून काही चुका झाल्या होत्या. त्यामुळे ‘माझ्यात इतरांपेक्षा पुष्कळ स्वभावदोष आहेत. मी काही करू शकत नाही’, असे विचार येऊन मला निराशा आली होते. मी माझ्या मनाच्या स्थितीविषयी पू. दादांना काहीही सांगितले नव्हते. ते माझ्यासोबत संगणकावर एक धारिका पडताळत होते. तेव्हा मी त्यांना काहीही न सांगता त्यांना माझी स्थिती लक्षात आली. त्यांनी धारिका पडताळण्याचे थांबवून माझी चौकशी केली आणि मला समजावले. ते म्हणाले, ‘‘आपण आपली समोरच्याशी तुलना करतो. समोरच्या व्यक्तीपेक्षा माझ्यात अधिक स्वभावदोष आहेत, असे वाटते; पण ‘आपला कितवा जन्म आहे, आपली किती साधना झाली आहे ?’, हे आपल्याला ठाऊक नाही. समजा, समोरच्याने १०० जन्म साधना केली असेल आणि मी ५० जन्म साधना केली असेल, तर तो माझ्यापेक्षा साधनेत पुढेच असणार आहे; कारण अगोदरचे ९९ जन्म त्याने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे स्वतःची तुलना इतरांशी करायची नाही. आपल्यात कितीही स्वभावदोष असले, तरी गुरूंच्या कृपेने ते जाणारच आहेत. ‘गुरुकृपेने मी सर्व स्वभावदोषांवर मात करीन’, हे वाक्य स्वयंसूचनेप्रमाणे दिवसातून किमान ३० वेळा मनाला सांगायचे. यामुळे तुझा आत्मविश्वास वाढेल आणि तुझे प्रयत्न सकारात्मकतेने होतील.’
– कु. रूपाली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.६.२०२२)
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
गुरुस्मरणाचा अद्भुत आनंद देणारा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा चैतन्यमय सत्संग !
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !