‘हलाला’ करण्यास नकार दिल्याने धर्मांधाने घटस्फोटित पत्नीवर फेकले ॲसिड

(‘हलाला’ म्हणजे तलाक दिल्यानंतर पुन्हा त्याच पतीशी विवाह करण्यापूर्वी दुसऱ्या मुसलमानाशी शारीरिक संबंध ठेवणे)

बरेली (उत्तरप्रदेश) – आपल्या थोरल्या बंधूशी ‘हलाला’ करण्यास नकार दिल्याने इशाक नावाच्या ३४ वर्षीय मुसलमानाने त्याच्या पूर्व पत्नीवर ॲसिड फेकल्याची घटना येथे नुकतीच घडली. महिलेच्या तोंडवळ्यावर गंभीर दुखापत झाली असून तिला जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी इशाकला अटक केली आहे. इशाकने ११ वर्षांपूर्वी या महिलेशी विवाह केला होता. त्यांना दोन मुली आहेत. एक मासापूर्वी आरोपीने तीन तलाक म्हणत पीडित महिलेला तलाक दिला होता. तेव्हापासून पीडित महिला तिच्या आई-वडिलांकडे रहात होती. इशाकला पीडित महिलेशी पुन्हा विवाह करायचा होता. त्यासाठी तो त्याच्या थोरल्या बंधूशी ‘हलाला’ करण्यासाठी तिच्यावर दबाव आणत होता,
अशी माहिती बरेली पोलिसांनी दिली.

संपादकीय भूमिका

  • एरव्ही अल्पसंख्य असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात, हे लक्षात घ्या !
  • ‘तीन तलाक’सारख्या जाचक रुढीवर प्रतिबंध घातल्यावर आता केंद्र सरकारने ‘हलाला’ या भयावह प्रथेवरही बंदी लादली पाहिजे !