उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्याच्या प्रारूपासाठी समितीची स्थापना

सामान नागरी कायद्यासाठी समितीचे गठन

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यात समान नागरी कायदा करण्याचे आश्‍वासन विधानसभा निवडणुकीत दिले होते.

त्यानुसार आता त्यांनी कायद्याचे प्रारूप बनवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे.