आंदोलकांनी राज्याचे मंत्री आणि आमदार यांची घरे जाळली !

आंध्रप्रदेशात कोनासीमा जिल्ह्याचे नाव ‘डॉ. बी.आर्. आंबेडकर’ करण्यास विरोध

कोनासीमा (आंध्रप्रदेश) – कोनासीमा जिल्ह्याचे नाव पालटून ‘डॉ. बी.आर्. आंबेडकर कोनासीमा’ असे करण्याच्या प्रस्तावाला विरोध करत अमलापूर शहरात शेकडो लोकांकडून निदर्शने करण्यात आली.

संतप्त आंदोलनकर्त्यांनी राज्याचे परिवहन मंत्री पिनिपे विश्‍वरूपु यांचे, तसेच आमदार पोन्नडा सतीश यांची घरे जाळली. या वेळी झालेल्या हिंसाचारात काही आंदोलक आणि पोलीस घायाळ झाले.

‘कोनासीमा साधाना समिती’कडून आंदोलन करण्यात आले होते. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्यामुळे येथे हिंसाचार झाल्याचा दावा केला जात आहे. आंदोलकांनी या वेळी पोलिसांवर दगडफेक केली, तसेच एक बसगाडीही जाळली.

संपादकीय भूमिका

जनतेचा इतका तीव्र विरोध असतांना नामांतर कसे केले जात आहे ? असा प्रश्‍न जनतेला पडणारच !