हिंदूंनो, लवकरात लवकर हिंदु राष्ट्र आणूया अपार कष्ट करून ।

श्री. अनिल कुलकर्णी

नववर्षाचे भव्य स्वागत करूया घरोघरी गुढी उभारून ।
हेवेदावे अन् भेदभाव विसरून एक होऊ केवळ ‘हिंदु’ म्हणून ।
लवकरात लवकर हिंदु राष्ट्र आणूया अपार कष्ट करून ।
सर्व हिंदु बांधवांना हार्दिक शुभेच्छा सनातन परिवाराकडून ।। १ ।।

वर्षारंभी आपल्या दारी शुभ तोरण लावूनी ।
अन् हिंदु राष्ट्राची भव्य गुढी उभारूनी ।
शुभेच्छा देऊ एकमेका हिंदु राष्ट्राचा ध्यास घेऊनी ।
‘जयतु जयतु हिंन्दुराष्ट्रम्’ एकमुखी वदुनी ।। २ ।।

हिंदु राष्ट्रासाठी सर्वत्रचे हिंदू एकवटले ।
जगभर हिंदु राष्ट्राचा नाद घुमू लागला ।
गुढीपाडवा ‘नववर्ष’ म्हणूनी साजरा करू लागला ।
लवकरच पहायला मिळेल हिंदु राष्ट्र आपल्याला ।। ३ ।।

– श्री. अनिल कुलकर्णी (वय ७५ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२९.३.२०२२)