आटपाडी (जिल्हा सांगली) येथे हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ या कार्यक्रमाला हिंदुत्वनिष्ठांचा उदंड प्रतिसाद !
आटपाडी (जिल्हा सांगली), ६ डिसेंबर (वार्ता.) – या जगामध्ये अनेक ख्रिस्ती आणि मुसलमान राष्ट्र आहेत; पण एकही हिंदु राष्ट्र नाही. हिंदु धर्मावर होणारे अनेक आघात रोखायचे असतील, तर या देशाला हिंदवी स्वराज्यासारख्या हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही. हिंदूंच्या सर्व समस्येवरील एकमेव उत्तर म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना हेच आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे सांगली जिल्हा समन्वयक श्री. संतोष देसाई यांनी येथे केले. येथील ‘शौर्य ग्रँड’ या उपाहारगृहाच्या सभागृहात मार्गदर्शन झाले. त्या वेळी ते बोलत होते. हिंदु राष्ट्र निर्मितीच्या दृष्टीने समाजामध्ये अपसमज पसरवले जात आहेत. ते दूर व्हावे त्या दृष्टीने हिंदु जनजागृती समितीला ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी विशेष आमंत्रित करण्यात आले होते. या माध्यमातून श्री. संतोष देसाई यांची १ घंट्याची मुलाखत घेऊन सर्व शंकांचे निरसन करण्यात आले.
मुंबई येथील पत्रकार श्री. किशोर बोराटे यांनी श्री. संतोष देसाई यांची ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’, तसेच हिंदुत्वाच्या संदर्भात सध्या चालू असलेल्या घडामोडींविषयी सविस्तर मुलाखत घेतली. श्री. किशोर बोराटे हे ‘तिसरा डोळा’ या नावाने ‘यू ट्यूब’ या सामाजिक माध्यमातून माहिती प्रसारित करतात. कार्यक्रमात प्रास्ताविक श्री. मधुकर माळी यांनी केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय घाटगे, ‘सनातन प्रभात’चे वाचक उपस्थित होते. या कार्यक्रमाला पुणे, मुंबई, नाशिक, धुळे, सातारा आदी विविध शहरांतील हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हिंदुत्वनिष्ठ मधुकर माळी यांनी कार्यक्रमासाठी जिज्ञासूंना संघटित केले !आटपाडी येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. मधुकर माळी यांनी ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ या सामाजिक माध्यम समूह गटातील सर्व महाराष्ट्रातील जिज्ञासूंना ‘ऑनलाईन’ जोडून चौथ्या संमेलनाचे आयोजन आटपाडी येथे केले होते. यामध्ये विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहिल्यानगर, जळगाव, नाशिक, पुणे या शहरांतून जिज्ञासू, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. |
क्षणचित्रे
१. हिंदुराष्ट्र : आक्षेप आणि खंडन’, तसेच ‘सनातन’चे पंचांग घेण्याविषयी हिंदुत्वनिष्ठ श्री. मधुकर माळी यांनी आवाहन केल्यानंतर उपस्थित असलेल्या जिज्ञासूंनी ग्रंथ आणि पंचांग खरेदी केले.
२. ‘१ घंट्याच्या मुलाखतीतून बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत’, असा अभिप्राय उपस्थित असलेल्या सर्व हिंदुत्वनिष्ठ आणि जिज्ञासू यांनी दिला.
वैशिष्ट्यपूर्ण
कु. प्रांजली दत्तात्रय पवार या ९ वीत शिकणार्या मुलीने ‘पीपीटी स्लाइड प्रोजेक्टर’ वरून दाखवण्याची सेवा केली. या संदर्भात श्री. दत्तात्रय पवार आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. कविता पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.