‘हिंदु राष्ट्र नक्की कसे असेल ?’, अशी जिज्ञासा असलेल्यांनी सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट देऊन हिंदु राष्ट्राचे लघू रूप अनुभवावे !

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

‘जेव्हा जेव्हा समाजात हिंदु राष्ट्र स्थापनेची चर्चा होते, तेव्हा लोकांच्या मनात प्रश्न पडतो की, ‘हिंदु राष्ट्र नक्की कसे असणार आहे ? त्याची वैशिष्ट्ये कोणती असतील ?’ जे हिंदुत्वनिष्ठ सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात येऊन जातात, ते अत्यंत प्रभावित होतात.

श्री. शंभू गवारे

‘आश्रम म्हणजे हिंदु राष्ट्राचे एक लघु रूपच आहे’, अशी त्यांना अनुभूती येते. आम्ही साधक प्रसार करतांना हिंदुत्वनिष्ठांना सांगतो, ‘‘तुम्हाला हिंदु राष्ट्र पहायचे असेल, तर एकदा सनातन संस्थेच्या आश्रमाला अवश्य भेट द्या !’’ हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हिंदु राष्ट्राविषयी सांगतात, ‘‘हिंदु राष्ट्र प्रत्येक हिंदूच्या मनात आणि गावागावांत स्थापन झाले पाहिजे !’’

– श्री. शंभू गवारे, हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत राज्य समन्वयक (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ४७ वर्षे), धनबाद, झारखंड. (२६.७.२०२४)