नामजप करतांना श्रीविष्णुरूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जागी शिवपिंडी दिसणे, त्या वेळी ‘हरि-हर नाही भेदाभेद’ ही पंक्ती मनात येणे आणि आगामी काळात लयाशी संबंधित कार्य होणार असल्याने परात्पर गुरुदेवांनी शिवपिंडीच्या रूपात दर्शन दिल्याचे जाणवणे
‘३१.७.२०२० या दिवशी सकाळी ९ वाजता मी नामजप करत होते. मला ‘श्री विष्णवे नमः ।’ हा नामजप करायचा होता. त्यामुळे मी ‘श्रीविष्णुरूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले समोर आहेत आणि मी नामजप करत एकेक तुळशीपत्र त्यांच्या चरणांवर वहात आहे’, असा भाव ठेवला. बराच वेळ माझा नामजप चांगल्या पद्धतीने होत होता. साधारण २० मिनिटांनी माझ्या लक्षात आले, ‘माझ्या समोर श्रीविष्णुरूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले नाहीत, तर शिवपिंडी आहे आणि मी शिवपिंडीवर बिल्वपत्र वहात आहे.’ त्या वेळी माझा ‘श्री विष्णवे नमः ।’ हाच नामजप होत होता. त्या वेळी माझ्या मनात आले, ‘हरि-हर नाही भेदाभेद ।’ त्यानंतर माझ्या मनात आले, ‘परात्पर गुरु डॉक्टर हेच श्रीविष्णु आहेत, तेच शिव आहेत आणि तेच सर्वस्व आहेत. काळानुसार त्यांचे सूक्ष्मातील कार्य भिन्न आहे; म्हणून ते विविध रूपांत दिसतात. यापुढील काळात लयाशी संबंधित कार्य होणार असल्याने त्यांनी शिवपिंडीच्या रूपात दर्शन दिले. परात्पर गुरुदेवांनी साधकांना ‘श्री विष्णवे नमः ।’ हा नामजप करायला सांगितला असल्याने नामजप तोच राहिला; परंतु कार्यानुरूप रूप भिन्न दिसले.’ – सुश्री (कु.) राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.७.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |