फोंडा येथे रहाणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या सासूबाई आणि पू. नीलेश सिंगबाळ यांच्या आई श्रीमती सुधा सिंगबाळ (वय ८२ वर्षे) यांनी सनातनचे ११७ वे संतपद प्राप्त केलेल्या कार्यक्रमाचे कु. मधुरा भोसले केलेले सूक्ष्म परीक्षण !
‘७.२.२०२२ या दिवशी पू. नीलेश सिंगबाळ यांच्या फोंडा येथील निवासस्थानी एका अनौपचारिक कार्यक्रमामध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या सासूबाई आणि पू. नीलेश सिंगबाळ यांच्या आई श्रीमती सुधा सिंगबाळ (वय ८२ वर्षे) यांनी व्यष्टी संतपद प्राप्त केल्याचे घोषित करण्यात आले. तेव्हा मी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमामध्ये होते. तेव्हा देवाच्या कृपेने या कार्यक्रमाचे माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण पुढीलप्रमाणे आहे.
१. पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ यांच्या हृदयात प्रभु श्रीरामाचे अस्तित्व जाणवणे आणि त्यांचे संतपद घोषित केल्यावर रामतत्त्व कार्यरत होऊन वातावरणात भक्ती अन् रामतत्त्व यांच्या संयुक्त निळसर रंगाच्या लहरींचे प्रक्षेपण होणे
पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ यांच्या हृदयात मला प्रभु श्रीरामाचे अस्तित्व जाणवले. जेव्हा त्यांचे संतपद घोषित करण्यात आले, तेव्हा त्यांच्या हृदयातील भक्तीमुळे जागृत झालेले प्रभु श्रीरामाचे तत्त्व कार्यरत होऊन त्यांच्या हृदयातून संपूर्ण वातावरणात भक्ती आणि रामतत्त्व यांच्या संयुक्त निळसर रंगाच्या लहरी पसरू लागल्या. या लहरी २.५ कि.मी. अंतरावरील सनातनच्या रामनाथी आश्रमापर्यंत सूक्ष्मातून आल्याचे मला जाणवले. या लहरींचा स्पर्श माझ्या हृदयाला झाल्यामुळे माझे अनाहतचक्र जागृत झाले आणि माझा प्रभु श्रीरामाप्रतीचा भाव जागृत झाला.
२. पू. आजींचे त्यांच्या हृदयातील भगवंताशी अखंड अनुसंधान असल्यामुळे त्यांच्याकडून चैतन्याचे प्रक्षेपण होणे
पू. आजींचे त्यांच्या हृदयातील भगवंताशी अखंड अनुसंधान असल्यामुळे त्यांच्या मनावरील मायेचा प्रभाव न्यून होऊन त्यांना सतत ईश्वराकडून चैतन्य मिळते. त्यामुळे त्यांचे नेत्र, मुख आणि आज्ञाचक्र यांतून पुष्कळ प्रमाणात पिवळसर रंगाच्या चैतन्याचा झोत बाहेर पडून आजूबाजूचे वायूमंडल चैतन्यमय होते.
३. पू. आजींचा अहं अत्यल्प असल्यामुळे त्यांच्या मनावर नातेवाइकांच्या संदर्भातील मायेतील नात्याचा संस्कार पुष्कळ प्रमाणात अल्प असल्याने त्यांनी कुटुंबियांशी असणार्या मायेतील नात्याचा त्याग केलेला असणे
पू. आजींचा अहं अत्यल्प आहे. त्यांची देहबुद्धी अल्प असल्यामुळे त्यांच्या मनावर नातेवाइकांच्या संदर्भातील मायेतील नात्याचा संस्कार पुष्कळ प्रमाणात अल्प आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कुटुंबियांशी असणार्या मायेतील नात्यांचाही त्याग केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या हृदयात भाव आणि आनंद यांचे दिव्य कमळ फुललेले असते. या दिव्य कमळातून मंद गोड सुगंध, थंड लहरी आणि आनंदाचे तुषार बाहेर पडत असतात. त्यामुळे त्या सतत आनंदावस्थेत असतात.
४. पू. आजींमध्ये वैराग्यभाव जागृत झाला असून त्यांच्या मनामध्ये भगवंताप्रती आंतरिक ओढ निर्माण झालेली असणे
पू. आजींनी त्यांचा मुलगा, सून आणि नातू (श्री. सोहम्) यांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी अनुमती देऊन त्यांची साधना होण्यासाठी अप्रत्यक्षरित्या त्यागच केला आहे. या त्यागामुळे त्यांच्यामध्ये वैराग्यभाव जागृत झाला असून त्यांच्या मनामध्ये भगवंताप्रती आंतरिक ओढ निर्माण झालेली आहे.
५. व्यष्टी साधनेमुळे स्वत:तील देवत्व जागृत झालेले असणे
व्यष्टी साधना करून स्वत:तील देवत्व जागृत करून स्वत:तील देवाला सतत अनुभवल्याने त्यांचा मनोमयकोश आणि मनोमय देह यांची पुष्कळ प्रमाणात शुद्धी झालेली असून त्यांच्या चित्तशुद्धीची प्रक्रिया आरंभ झालेली आहे. त्यामुळे त्यांची आध्यात्मिक पातळी वाढून त्या संतपदी विराजमान झाल्या आहेत.
६. पू. नीलेश सिंगबाळ यांनी पू. आजींना पुष्पहार घालून त्यांचा सन्मान केला, तेव्हा प्रभु श्रीरामानेच पू. आजींच्या गळ्यात देवकृपेचे प्रतीक असलेला चैतन्यदायी पुष्पहार घालून त्यांचा सन्मान केल्याचे जाणवणे
जेव्हा पू. नीलेश सिंगबाळ यांनी पू. आजींना पुष्पहार घालून त्यांचा सन्मान केला, तेव्हा प्रभु श्रीरामानेच पू. आजींच्या गळ्यात देवकृपेचे प्रतीक असलेला चैतन्यदायी पुष्पहार घालून त्यांचा सन्मान केल्याचे जाणवले. या प्रसंगातून भगवंताने त्याच्या भक्तावर प्रसन्न होऊन ही दिव्य कृपा केल्याचे जाणवले. त्याच वेळी स्वर्गलोकातील देवता आणि ऋषिलोकातील ऋषि यांनी पू. आजींवर सूक्ष्मातून पुष्पवृष्टी केल्याचे जाणवले. त्याचप्रमाणे काही स्थानदेवता आणि ग्रामदेवता यांनीही कार्यक्रमस्थळी सूक्ष्मातून येऊन पू. आजींच्या चरणांवर विविध फुले वाहून त्यांच्याप्रतीचा आदरभाव व्यक्त केल्याचे जाणवले.
७. पू. आजींचा सोहळा चालू असतांना सभोवताली रामलोकातील १० टक्के वायूमंडल सूक्ष्मातून निर्माण होऊन पंचमहाभूतांच्या स्तरांवरील अनुभूती येणे
पू. आजींचा सोहळा चालू असतांना सभोवताली रामलोकातील १० टक्के वायूमंडल सूक्ष्मातून निर्माण झाल्याचे जाणवले. तेव्हा प्रभु श्रीरामाचे तत्त्व वायूमंडलात कार्यरत झाल्यामुळे मला पंचतत्त्वांच्या स्तरांवर पुढील अनुभूती आल्या.
८. प्रभु श्रीरामाचे तत्त्व वायूमंडलात कार्यरत झाल्यामुळे पंचमहाभूतांच्या स्तरांवर आलेल्या अनुभूती
९. पू. सिंगबाळआजींच्या संतपद प्राप्त करण्यासाठी विविध योगमार्गांनुसार झालेल्या साधनेचे स्वरूप, उदाहरण आणि प्रमाण
१०. पू. सिंगबाळ आजींनी संतपद प्राप्त केल्यावर त्यांच्याकडून प्रक्षेपित झालेल्या विविध घटकांमुळे सूक्ष्म स्तरावर आलेली अनुभूती
११. पू. सिंगबाळआजींच्या देहातील अवयवांशी संबंधित कुंडलिनीचक्रे, त्या ठिकाणी सूक्ष्मातून उमललेली दिव्य कमळे, त्यांचाशी संबंधित पंचतत्त्व आणि त्यांतून प्रक्षेपित होणारे घटक
कृतज्ञता
‘प्रभु श्रीराम आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे पू. सिंगबाळआजींच्या संतसन्मान सोहळ्याचे सूक्ष्म परीक्षण करण्याची सेवा झाली आणि त्यांच्या दिव्यत्वाची अनुभूती आली’, यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञतापुष्प अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.२.२०२२)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |