‘इस्रो’कडून ३ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) – भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् ‘इस्रो’ने येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातील पहिल्या प्रक्षेपण केंद्रावरून ‘अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट’ अर्थात् ‘पृथ्वी निरीक्षण उपग्रह’ आणि ‘इस्रो’चे अन्य २ उपग्रह यांचे यशस्वी प्रक्षेपण केले. ‘पृथ्वी निरीक्षण उपग्रह’ हा कृषी, वनीकरण, वृक्षारोपण, जलविज्ञान आदी गोष्टींसाठी, तसेच सर्व प्रकारच्या हवामानातील उत्तम दर्जाची छायाचित्रे पाठवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अन्य एका उपग्रहाद्वारे पाणथळ प्रदेश, भूमीचा पृष्ठभाग, तसेच तलावांच्या पाण्याच्या पृष्ठभागासह विविध गोष्टींच्या तापमानाचा अंदाज घेणे शक्य होणार आहे.