हिंदूंना हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याची शपथ देणार्‍या व्यापार्‍यावर गुन्हा नोंद !

पाकिस्तान निर्माण करण्यास अनुमती देणार्‍या काँग्रेसचे सरकार छत्तीसगडमध्ये असल्याने असा गुन्हा नोंदवण्यात आल्याचे आश्‍चर्य ते काय ? – संपादक

हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याची शपथ घेताना व्यापारी

कोरबा (छत्तीसगड) – येथील एका व्यापार्‍याने हिंदूंना अग्नीच्या साक्षीने ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याची आणि स्वतःच्या आस्थापनांमध्ये केवळ हिंदूंना काम देण्याची शपथ दिली. यावरून त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या शपथेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला. शपथ देणार्‍या व्यापार्‍याचे नाव प्रमोद अग्रवाल आहे. हिंदु सुरक्षा सेनेसाठी ते काम करतात.