राष्ट्रहितासाठी राष्ट्रकंटकांचा समूळ नाश होणे आहे आवश्यक !

पू. तनुजा ठाकूर यांचे मौलिक विचार

पू. तनुजा ठाकूर

‘राजधर्माचे सिद्धांत सांगणार्‍या आपल्या अनेक धर्मग्रंथांमध्ये दिलेल्या दृष्टीकोनांचा अभ्यास करून आजच्या शासनकर्त्यांनी योग्य कृती केली पाहिजे.

मनुस्मृतीनुसार,

यथोद्धरति निर्दाता कक्षं धान्यं च रक्षति ।
तथा रक्षेन्नृपो राष्ट्रं हन्याच्च परिपन्थिनः ।।

– मनुस्मृति, अध्याय ७, श्लोक ११०

अर्थ : ज्याप्रमाणे शेती करणारा शेतकरी धान्याच्या रक्षणासाठी तण उपटून टाकतो, त्याचप्रमाणे राजाने राष्ट्राच्या रक्षणासाठी राष्ट्रकंटकांना पूर्णपणे नष्ट केले पाहिजे.

या देशाच्या शासनकर्त्यांनी राजधर्माच्या या सिद्धांताचे पालन करत दुर्जनांना शिक्षा करण्याबाबत आता काही कठोर निर्णय निश्चितच घेतले पाहिजेत आणि या निर्णयाला विरोध करणार्‍या देशद्रोह्यांनाही शिक्षा केली पाहिजे. राष्ट्रहिताच्या दृष्टीने आतंकवाद्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. ‘आता नाही, तर कधीच नाही’, या संकल्पानुसार लवकर कृती करावी, हीच देशवासियांची या शासनकर्त्यांकडून अपेक्षा आहे. आपण भारतीय आणखी किती दिवस आपल्या सैनिक बांधवांचा आतंकवाद्यांच्या हातून बळी जातांना पहात रहाणार ?’

– पू. तनुजा ठाकूर, संस्थापक, वैदिक उपासनापीठ (२०.११.२०२१)