पू. तनुजा ठाकूर यांचे मौलिक विचार
टीप : मतदान यंत्रावरील ‘नन ऑफ द अबाऊव्ह (यांपैकी कुणीही नाही)’ पर्यायाचे बटण
‘मध्यप्रदेश विधानसभेच्या पोटनिवडणुकीत या वेळी भाजपचा उमेदवार ६ सहस्र १०० मतांनी विजयी झाला असून काँग्रेस दुसर्या क्रमांकावर आहे. ‘नोटा’ला ५ सहस्र ६११ मते मिळाली. यावरून देशातील जनता आता थोडी जागरूक होत असल्याचे दिसून येत आहे. ‘अपात्र उमेदवाराला मतदान करण्याऐवजी ‘नोटा’ चे बटण दाबणे चांगले’, असे त्यांना वाटते. भारतातील मागील काही काळापासून ‘नोटा’ची लोकप्रियता हे सांगत आहे की, भारतातील लोकशाही आता शेवटचे श्वास मोजत आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने डिसेंबर २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत ‘इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन’मध्ये ‘यांपैकी काहीही नाही’, असा पर्याय देण्याचा निर्देश दिला होता. मतमोजणीच्या वेळी ‘नोटा’ पर्यायाला झालेल्या मतांचीही मोजणी केली जाते. जेव्हा आपल्या देशात ‘नोटा’ची व्यवस्था नव्हती, तेव्हा निवडणुकीत मतदार मतदान न करून स्वतःचा विरोध दर्शवत असत. वर्ष २०१७ आणि २०१८ मध्ये झालेल्या कर्नाटक, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांतील विधानसभा निवडणुका यांमध्ये ‘नोटा’ पर्याय मोठ्या प्रमाणात वापरला गेला. हे पहाता ‘आपल्या लोकशाहीत काही पालट झाला आहे’, असे वाटत नाही. हा समस्येवरचा उपाय नाही; कारण ‘नोटा’ पर्याय उमेदवार अपात्र असल्याचे दाखवते.
त्यामुळे भारतियांनो, ‘नोटा’ बटण दाबून या राष्ट्राप्रती तुमचे कर्तव्य पार पाडले आहे’, असे समजू नका. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सक्रीय व्हा आणि त्याची स्थापना करा, हाच सर्व समस्यांवर उपाय आहे !’
– पू. तनुजा ठाकूर (११.६.२०२१)