राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २८.६.२०२१

प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

तमिळनाडूतील सत्ताधारी हिंदुद्वेषी द्रविड मुन्नेत्र कळघम् पक्षाच्या राज्यातील कायदाद्रोही पोलिसांनी बलात्कार करणार्‍यांविरुद्ध कित्येक मास कारवाई न करणे !

प्रतिकात्मक छायाचित्र

‘तिरुवत्तुर (तमिळनाडू) येथील वीयन्नूर गावामध्ये रहाणार्‍या एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यासह त्याचे चित्रीकरण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ‘अरुमनाई ख्रिश्चियन असोसिएशन’चा (‘ए.सी.ए.’चा) सचिव पाद्री अरुमनाई स्टीफेन याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. तसेच सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम्च्या (द्रविड प्रगती संघाच्या) जॉन ब्राइट, हेन्सलिन आणि जेबराज या कार्यकर्त्यांसह अन्य ७ जणांवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या महिलेने एप्रिल २०२१ मासामध्येच तक्रार केली होती; मात्र आरोपींचे संबंध सत्ताधारी द्रमुक पक्षाशी असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही.’


असे खासदार जनतेपुढे काय आदर्श ठेवणार ? वर्गातील गडबड करणार्‍या मुलांप्रमाणे असणारे खासदार !

‘राज्यसभेतील सभापतींच्या समोरील मोकळ्या जागेत गोंधळ घातल्याच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या ६ खासदारांना निलंबित करण्यात आले. ४.८.२०२१ या दिवशी सकाळी राज्यसभेचे कामकाज चालू झाल्यानंतर या खासदारांनी गोंधळ घालण्यास चालू केल्यावर त्यांना निलंबित करण्यात आले.’


जे सरकारी कर्मचार्‍यांना जमत नाही, ते खासगी व्यावसायिकांना जमते, हे सरकारला लज्जास्पद !

‘नागरिकांना अल्प पैशांमध्ये चांगली सुविधा मिळावी, यासाठी सोलापूर महानगरपालिकेचा परिवहन उपक्रम चालू आहे, मागील अनेक वर्षांपासून परिवहन सेवा तोट्यात आहे. केंद्रशासनाच्या ‘जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजने’द्वारे परिवहन समितीला १०० बसगाड्या प्राप्त झाल्या होत्या. यामधील ९९ बसगाड्यांचा सांगाडा खराब झाला असून त्या वापराविना पडून आहेत. शहरात केवळ १८ बसगाड्या प्रत्यक्ष चालू आहेत. अन्य ७४ बसगाड्या विविध कारणांमुळे बंद आहेत. मागील अनेक मासांपासून या सर्व बसगाड्या विनावापर असल्याने त्यामध्ये अक्षरश: लहान झाडे आणि वेली उगवल्या आहेत. इतकी गंभीर स्थिती झाल्यानंतर आता महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी ‘महापालिका परिवहन उपक्रमाचे खासगीकरण करणे उचित ठरेल’, असे मत व्यक्त केले आहे.’


‘स्वेच्छा निवृत्ती’ऐवजी श्रीकृष्णाच्या नामजपासह पोलीस खात्यातील पोलिसांना भ्रष्टाचारापासून मुक्त, कार्यक्षम आणि साधक केले असते, तर समष्टी साधना होऊन कृष्णाची प्राप्ती लवकर झाली असती !

भारती अरोरा

‘संत मीराबाईंप्रमाणे कृष्णभक्तीमध्ये जीवन व्यतीत करण्यासाठी हरियाणाच्या वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी भारती अरोरा (वय ५० वर्षे) यांनी स्वेच्छा सेवानिवृत्तीसाठी आवेदन दिले आहे. अरोरा यांना त्यांचे उर्वरित आयुष्य धार्मिक कार्यात व्यतीत करायचे आहे. यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. (पोलीसदलात असा अधिकारी किंवा कर्मचारी सापडणे, ही दुर्मिळातील दुर्मिळ गोष्टच म्हणावी लागेल ! – संपादक) हरियाणा ‘कॅडर’च्या भारतीय पोलीस सेवेतील (आय.पी.एस्.) अधिकारी अरोरा यांच्या आवेदनावर अद्याप शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. (हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने एखादी व्यक्ती धार्मिक कार्यासाठी स्वेच्छा निवृत्ती घेत असेल, तर तिला समजावण्याचा प्रयत्न केला जातो, हे लक्षात घ्या ! याउलट जैन पंथामध्ये लहानपणीच मुले पालकांच्या कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा त्याग करून संन्यासी होतात, तेव्हा अशा मुलांची मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला जातो ! – संपादक)’