भारतात फेसबूक, व्हॉट्सॲप आणि ट्विटर यांचा मनमानी कारभार चालू आहे. ही सामाजिक माध्यमे देशात उपयोगात आणली जात असतांना त्यांनी भारताचे कायदे आणि राज्यघटना यांचा मान राखला पाहिजे; पण तसे होतांना दिसून येत नाही. ब्रिटिशांच्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’प्रमाणे ही सामाजिक माध्यमे देशावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहेत. हा ‘वैचारिक आतंकवाद’च म्हणावा लागेल. फेसबूकने सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, भाग्यनगरचे भाजपचे आमदार राजासिंह ठाकूर, ‘सुदर्शन वृत्तवाहिनी’ यांची खाती बंद केली. या फेसबूक खात्यांवरील लिखाण कोणत्याही प्रकारे घटनाविरोधी नसतांना अचानक अशी खाती बंद का करण्यात आली ? हिंदु धर्माचा प्रचार करणे, हा काय अपराध आहे का ? रझा अकादमी, हिंदुद्वेषी डॉ. झाकिर नाईक, लष्कर-ए-तोयबा, नक्षलवादी यांच्या पानांवरील लिखाण फेसबूकला आक्षेपार्ह वाटत नाही का ? त्यामुळेच फेसबूकसारख्या हिंदुद्वेषी माध्यमांना देशातून हद्दपार करायला हवे.