गोवंशियांना पशूवधगृहाकडे नेणार्‍या वाहनाची विचारणा केल्यामुळे गोरक्षकांना मारहाण करून त्यांचे अपहरण !

धर्मांधांचा उद्दामपणा गोरक्षणाचे कार्य करणार्‍या हिंदूंच्या जिवावर उठला आहे, हे लक्षात घेऊन धर्मांधांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे !

नळदुर्ग (जिल्हा धाराशिव) – गोवंशियांना पशूवधगृहाकडे नेत असतांना वाहन थांबवून त्याविषयी विचारणा केली असता तक्रारदारास बळजोरीने वाहनामध्ये बसवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून अपहरण करण्यात आले. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाणे येथे २६ जुलै या दिवशी अनिल सुनील पवार यांनी तक्रार दिल्यानंतर आरोपी जरार नासिरा कुरेशी यांसह अन्य ५ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

२६ जुलै या दिवशी तक्रारदार आणि तक्रारदाराचा मित्र यांनी सदर वाहन अडवून ‘त्यामध्ये काय आहे’, असे विचारले असता वाहनचालक ‘‘बैल आहे, तू गाडी का अडवली ?’’ असे म्हणून वाद घालू लागला. काही वेळातच अणदूरच्या दिशेने एक चारचाकी आली. त्या चारचाकीमधील चौघांनी तक्रारदारास पकडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि ‘नळदुर्ग येथे घेऊन जातो’, असे तक्रारदारास सांगून अक्कलकोट रस्त्याच्या बाजूलाच खाली उतरवले. संशयित आरोपीतील दोघांनी तक्रारदारास कमरेच्या पट्ट्याने त्याच्या पाठीत मारहाण केली आणि ‘पुन्हा गाडी अडवल्यास तुला सोडणार नाही’, अशी धमकीही दिली आहे. (गोरक्षकांना धर्मांधांकडून धमकी मिळणे हे धर्मांधांना कायद्याचे भय नसल्याचे द्योतकच नव्हे का ? – संपादक)