सरकारने पूरग्रस्तांना तात्काळ साहाय्य घोषित करावे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

कोल्हापूर – पूर येण्याचे प्रमाण वाढले असून पूरस्थितीचा सरकारने अभ्यास करायला हवा. सरकारने पूरग्रस्तांना तात्काळ साहाय्य घोषित करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ३० जुलै या दिवशी येथे केली. जिल्ह्यातील प्रयाग चिखली येथील दौर्‍यावर असतांना ते बोलत होते. त्यांच्यासमवेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस हे ३ दिवस पश्चिम महाराष्ट्र दौर्‍यावर असून पूरग्रस्तांशी संवाद साधत ते समस्या जाणून घेत आहेत. प्रयाग चिखली येथून त्यांनी शहरातील शाहुपुरी आणि कुंभार गल्ली या ठिकाणी असलेल्या पूरग्रस्तांची भेट घेतली.