केकमधून अमली पदार्थ विकणार्‍या धर्मांध आधुनिक वैद्याला अटक !

प्रत्येक वेळी गुन्हेगारीत धर्मांधांचा पुढाकार असतो, हे लक्षात घ्या !

ड्रग्जने भरलेले हे केक आणि ब्राऊनी रेव्ह पार्टीमध्ये पुरवले जात होते.

मुंबई – केक आणि ब्राऊनी यांमध्ये अमली पदार्थ भरून त्यांची विक्री करणार्‍या रहमीन या आधुनिक वैद्याला अमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबईतून अटक केली आहे. यानंतर दक्षिण मुंबईतून रमजान शेख याला ५० ग्रॅम हॅशिशसह क्रॉफर्ड मार्केट येथून अटक करण्यात आली. हे केक आणि ब्राऊनी रेव्ह पार्टीमध्ये पुरवले जात होते.

अमली पदार्थ विरोधी पथकाचे क्षेत्रीय संचालक (झोनल डायरेक्टर) समीर वानखेडे यांना केकमधून अमली पदार्थ पुरवले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी माझगावमधील बेकरीवर धाड टाकली. यामध्ये अमली पदार्थ वापरून सिद्ध केलेला १० किलोचा (हॅश ब्राऊनी) केक, ३५० ग्रॅम ओपियम आणि १ लाख ७० सहस्र रुपये कह्यात घेतले. चौकशीमध्ये रहमीन या मानसोपचार तज्ञाकडून बेकरीच्या नावाखाली ही अमली पदार्थांची प्रयोगशाळा चालवली जात असल्याचे उघड झाले. हा धर्मांध महाविद्यालयात असल्यापासून या व्यवसायात असल्याचे समजते.