साम्यवाद्यांच्या राष्ट्रविरोधी विचारसरणीमागे हिंदुविरोधी विचारसरणी लपलेली आहे; कारण भारतासाठी हिंदूच ठामपणे उभे राहून कार्य करू शकतात, हे साम्यवाद्यांना ठाऊक आहे. त्यामुळेच ते भारतविरोधी बातम्या दाखवत आहेत आणि साम्यवादी विचारधारा देशावर प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदुत्व म्हणजे साम्यवाद्यांच्या वाटेतील एक अडथळा आहे आणि म्हणूनच त्याला विरोध होत आहे. आताची हिंदुविरोधी परिस्थिती पहाता हिंदूंनी जागृत व्हायला हवे. हिंदुविरोधी प्रसारमाध्यमांवर बहिष्कार घालायला हवा. सेक्युलर माध्यमांनी मांडलेल्या विचारांवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता सामाजिक माध्यमांमध्ये येणार्या बातम्यांचा अभ्यास करून आणि माहिती मिळवून सत्य परिस्थिती लक्षात घ्यायला हवी.