सावंतवाडी तालुक्यात ३४ लाख रुपयांच्या मद्याची अवैध वाहतूक रोखली

मद्याची अवैध वाहतूक पोलीस कायमस्वरूपी का रोखू शकत नाहीत ?

सावंतवाडी – गोवा येथून मुंबईला गोवा बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक करणार्‍या ट्रकवर पोलिसांनी तालुक्यातील इन्सुली येथील तपासणी नाक्यावर कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ३३ लाख ६६ सहस्र रुपयांचे मद्य कह्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना कह्यात घेतले आहे.

सावंतवाडी शहरातील बसस्थानकाजवळ अनिल मंचुरिया आणि अजय लालवाणी (दोघेही रहाणार कोल्हापूर) या दोघांना पोलिसांनी कह्यात घेऊन त्यांची तपासणी केली. या वेळी पोलिसांना त्यांच्याकडे असलेल्या पिशवीत एकूण ५० सहस्र रुपयांचे अवैध मद्य सापडले. दोन्ही ठिकाणी मिळून पोलिसांनी एकूण ३४ लाख १६ सहस्र रुपयांचे मद्य कह्यात घेतले. या दोन्ही घटनांत पोलिसांनी एकूण चौघांना कह्यात घेतले.

(गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी मार्गावर पोलीस तपासणी नाकी आहेत. असे असतांना लाखो रुपयांचे मद्य घेऊन वाहने जिल्ह्यात कशी प्रवेश करतात ? जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर तपासणी नाक्यांवर पोलिसांना वाहनांत मद्य सापडते, मग जिल्ह्यात प्रवेश करतांना तेथे असलेल्या पोलिसांना ते का सापडत नाही ? – संपादक)