पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची सन्मानाने सुटका करावी ! 

भारतीय जनक्रांती दल (डेमॉक्रेटिक) आणि राष्ट्रवादी संघटना यांची राष्ट्रपतींकडे मागणी

पाटलीपूत्र (बिहार) – पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळावे आणि त्यांची सन्मानपूर्वक सुटका करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनक्रांती दल (डेमॉक्रेटिक) आणि राष्ट्रवादी संघटना यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे. त्यांनी नुकतेच राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना एक निवेदन सादर केले. यात ही मागणी करण्यात आली.

या निवेदनामध्ये म्हटले आहे की, सरकारने अनेक मोठमोठे गुन्हेगार, बलात्कारी आणि भ्रष्टाचारी यांची प्रकरणे मागे घेऊन त्यांना कारागृहातून मुक्त केले आहे; परंतु सनातन धर्माच्या रक्षणासाठी संपूर्ण आयुष्य वेचणार्‍या पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना जामीन सोडा, योग्य वैद्यकीय उपचार देखील नाकारले जात आहेत. अशा प्रकारे कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या पूजनीय बापू यांना सामान्य नागरिकांच्या अधिकारांपासूनही वंचित ठेवले जात आहे. ते धर्मांतराच्या मार्गातील सर्वांत मोठा अडथळा बनले होते. त्यामुळे एका राजकीय षड्यंत्राच्या अंतर्गत त्यांची संस्था अन् संपूर्ण कुटुंब समाप्त करून हिंदु धर्माचा आवाज संपवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हे लक्षात घेऊन पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू आणि त्यांचे पुत्र पू. नारायणसाई यांची सन्मानाने त्वरित सुटका करण्यात यावी, अशी मागणी  करण्यात आली आहे.

निवेदनातील अन्य सूत्रे

२३५ अपंग मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी ख्रिस्ती पाद्र्यांना सूरत किंवा जोधपूर येथील कारागृहात बंदी बनवून सरकारने धर्मनिरपेक्ष असल्याचा प्रत्यय द्यावा.

वर्ष २००७ पासून सहस्रो हिंदु मुली अहिंदु लोकांच्या षड्यंत्राला बळी पडत आहेत.

न्यायालयांमध्ये हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या याचिकांना केराची टोपली दाखवण्यात येते आणि त्यांची कोणतीही सुनावणी होत नाही.

सरकारीकरण झालेल्या मंदिराच्या दानपेटीतील ९० टक्के पैसा ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्या संस्थांवर व्यय केला जातो.