नृत्य आणि संगीत यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
नृत्य साधना ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग
‘संगीत आकाशतत्त्वाशी संबंधित आहे; म्हणून पृथ्वी, आप, तेज आणि वायू या तत्त्वांशी संबंधित असलेल्या कलांपेक्षा संगीताशी संबंधित अनुभूती वरच्या स्तराच्या असतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
‘१९ आणि २० डिसेंबर २०२० या दिवशी कु. अपाला औंधकर या ५९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या बालसाधिकेने ‘भरतनाट्यम्’ या नृत्यप्रकारामध्ये शास्त्रीय गाण्यांवर नृत्ये सादर केली. त्यांचा योग्य तो परिणाम होण्यासाठी तिने अर्ध्या घंट्याच्या कालावधीत प्रत्येक नृत्य पुनःपुन्हा ३ वेळा सादर केले. तिने प्रयोग म्हणून प्रत्येक गाण्यावरील नृत्य ‘भरतनाट्यम् चा प्रचलित पोशाख घालून आणि साडी नेसून’ अशी दोन्ही वेशभूषांमध्ये सादर केले. त्यामागील उद्देश ‘त्या वेशभूषांमुळे नृत्यावर काय परिणाम होतो ?’, हे बघण्याचा होता. त्या वेळी मला जाणवलेला सूक्ष्मातील परिणाम पुढीलप्रमाणे होता.
१. ‘नटेश कौतुकम्’ या गाण्यावर ३ वेळा सादर केलेले भरतनाट्यम् नृत्य
१ अ. निष्कर्ष : या सारणीवरून पुढील सूत्रे लक्षात येतात.
१. अपालाने भरतनाट्यम् चा प्रचलित पोशाख घालून तीनदा केलेल्या नृत्यामध्ये प्रत्येक नृत्यातून प्रक्षेपित होणार्या त्रासदायक शक्तीचे प्रमाण वाढत जाऊन ते ९० टक्क्यांपर्यंत पोचले. याउलट तिने साडी घालून तीनदा केलेल्या नृत्यामध्ये प्रत्येक नृत्यातून प्रक्षेपित होणार्या त्रासदायक शक्तीचे प्रमाण न्यून होत जाऊन शेवटी ते शून्य टक्के झाले.
२. नृत्य करतांना भरतनाट्यम् चा प्रचलित पोशाख घातल्याने अपालावरील त्रासदायक शक्तीचे आवरण वाढत गेले. याउलट तिने साडी घालून केलेल्या नृत्यामुळे तिच्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण न्यून होत जाऊन ते शेवटी नाहीसे झाले.
३. अपालाने भरतनाट्यम् चा प्रचलित पोशाख घालून केलेल्या नृत्यातून प्रक्षेपित होणार्या त्रासदायक शक्तीच्या दाबामुळे शेवटी नृत्याची स्पंदने कोणत्याही चक्रावर जाणवली नाहीत. याउलट तिने साडी घालून केलेल्या नृत्यातून प्रक्षेपित होणार्या चांगल्या स्पंदनांमुळे शेवटी नृत्याची स्पंदने सहस्रारचक्रापर्यंत पोचली. याचा अर्थ नृत्याचा सकारात्मक स्तर वाढत गेला.
४. अपालाने भरतनाट्यम् चा प्रचलित पोशाख घालून केलेल्या नृत्यामध्ये चैतन्याचे प्रमाण न्यून होत गेले. याउलट तिने साडी घालून केलेल्या नृत्यामध्ये चैतन्य, आनंद आणि शांती यांचे प्रमाण वाढत गेले.
२. ‘गणेश पंचरत्नम्’ या गाण्यावर सादर केलेले भरतनाट्यम् नृत्य
२ अ. निष्कर्ष : ‘गणेश पंचरत्नम्’ या गाण्याचेही ‘सूत्र १ अ’ दिल्याप्रमाणेच निष्कर्ष आले. या वेळीही अपालाने भरतनाट्यम् चा प्रचलित पोशाख घालून केलेल्या नृत्यामुळे तिच्यावर त्रासदायक स्पंदनांचे अधिकाधिक आवरण आले, तसेच वातावरणातही त्रासदायक स्पंदने पसरली. याउलट तिने साडी नेसून केलेल्या नृत्यामुळे तिच्यावर आरंभी जे थोडेफार त्रासदायक आवरण होते, ते दूर झाले, तसेच तिच्या नृत्यातून शेवटी १०० टक्के चांगली स्पंदने प्रक्षेपित होऊ लागली.
अपालाने ‘नटेश कौतुकम्’ आणि ‘गणेश पंचरत्नम्’ या गाण्यांवर नृत्य करतांना प्रत्येक गाण्याच्या वेळी एकदा भरतनाट्यम् चा प्रचलित पोशाख घालून आणि नंतर साडी नेसून एकाच प्रकारे नृत्य सादर केले. असे असूनही केवळ वेशभूषेमुळे वर नमूद केल्याप्रमाणे एकमेकांच्या विरुद्ध परिणाम दिसून आला. यावरून नृत्य करतांना ‘भरतनाट्यम् चा प्रचलित पोशाख घातल्याने त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होतात, तर साडी नेसल्याने चांगली स्पंदने प्रक्षेपित होतात’, असे लक्षात येते.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२०.१२.२०२०)
|