अशी मागणी का करावी लागते ? सरकारकडे हे स्वतःहून करण्यासाठी यंत्रणा नाही का ?
पणजी, २९ जून (वार्ता.)- राज्य सरकारने ‘अटल सेतू’ या मांडवी नदीवरील नवीन पुलावरून प्रवास करणार्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या पुलाच्या बांधकामाविषयीचे परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते टुलिओ डिसोझा म्हणाले, ‘‘या पुलावरील विजेचे खांब कोसळून लोकांचे जीवन धोक्यात येईल, याविषयी आम्हाला काळजी वाटते. या पुलावर कोसळलेला १ वीजेचा खांब हे भाजपच्या भ्रष्टाचाराचे स्मारक आहे. हा पूल बांधल्यानंतर एका वर्षातच त्याला तडे गेले आणि अजूनही ते दुरुस्त केलेले नाहीत. या पुलावरील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पुलाखाली असलेले काँक्रीटचे ढिगारे अजूनही काढलेले नाहीत.’’