विकासकामांच्या समवेतच प्रभागातील इतर कामांकडेही नगरसेवकांनी लक्ष देणे अपेक्षित असतांना याविषयी सल्ला द्यावा लागतो, याचा विचार होणे आवश्यक आहे.
पुणे – नगरसेवकांनी पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आदी कामे करून घेण्यासमवेतच आपल्या प्रभागात संस्कृती निर्माण करावी. संस्कृतीची संबंधित कामे आपली नाहीत, असे मानू नये, असा सल्ला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला. शैलेश सोसायटी येथे सिद्ध केलेल्या संगीतकार पंडित भास्कर चंदावरकर पथ नामफलकाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील आणि गायक आनंद भाटे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. पंडित चंदावरकर यांचे पथाला नाव दिले याचा आनंद आहे, अशी भावना मीना चंदावरकर यांनी व्यक्त केली. संदीप खर्डेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.