उत्तर गोव्यात २ निरनिराळ्या धाडीत २ लक्ष रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात

दळणवळण बंदीमुळे सामान्य नागरिकांना त्यांचे दैनंदिन जीवन जगतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे असतांना अमली पदार्थ तस्कारांना मोकळे रान कुणी सोडले आहे ?

पणजी, २३ जून (वार्ता.) – गुन्हे अन्वेषण विभागाने २३ जून या दिवशी हरमल आणि हणजूण येथे धाड टाकून एकूण २ लक्ष रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेतले. या दोन्ही प्रकरणी नायजेरियन नागरिक चौकवुडी आणि आंध्रप्रदेशस्थित नागरिक एम्. रेड्डी यांना कह्यात घेण्यात आले आहे.