शिवराज्याभिषेकदिनाच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने २०० गरजू कुटुंबांना गोड भोजनाचे डबे वाटप !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतांना धारकरी

कोल्हापूर, २३ जून (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ७.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस दुग्धाभिषेक, स्मारक स्थळी पुष्प सजावट, साखर-पेढे वाटप करण्यात आले.

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे गोड भोजनाचे डबे वाटप करतांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठराविक धारकर्‍यांच्याच उपस्थितीत हा उत्सव साजरा करण्यात आला. गेली २ वर्षे कोरोनामुळे अनेकजणांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या वर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूरच्या वतीने कोल्हापुरातील २०० गरजू कुटुंबांना छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे गोड भोजनाचे डबे वाटप करण्यात आले.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आलेले भोजनाचे डबे

या वेळी कार्यवाहक श्री. आशिष लोखंडे, सर्वश्री सुमेध पोवार, गणेश जाधव, आशिष सोमवंशी, अवधूत चौगुले, संदेश पोलादे, ओमकार अतिग्रे, प्रसाद बुलबुले, अथर्व कोल्हापूरे, सोहम् लोखंडे, यश दळवी, ओंकार शिरोडकर, अनिकेत पाटील आदी धारकरी उपस्थित होते.