स्वत:च्या प्राचीन संस्कृतीवर विश्वास ठेवून मार्गक्रमण केल्यासच भारत पुढे जाईल ! – कंगना राणावत, अभिनेत्री

देशाचा ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ असा उल्लेख करण्याचे आवाहन

मुंबई – आपण पाश्चिमात्य देशांच्या नावाची नक्कल (कॉपी) करत राहिलो, तर आपला देश कधीच प्रगती करू शकणार नाही. एक ‘राष्ट्र’ म्हणून आपल्याला आपल्या प्राचीन ज्ञानाचे साहाय्य घेऊन विकास करणे आवश्यक आहे. स्वत:च्या प्राचीन संस्कृतीवर विश्वास ठेवून मार्गक्रमण केल्यासच भारत पुढे जाईल, असे मत अभिनेत्री कंगना राणावत यांनी सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे व्यक्त केले. यामध्ये त्यांनी देशवासियांना ‘देशाचा उल्लेख ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ करावा’, असेही आवाहन केले आहे. याविषयीच्या एका ‘पोस्ट’मध्ये कंगना राणावत यांनी म्हटले आहे की, गुलाम बनण्यापूर्वी आपण सांस्कृतिक आणि कला या क्षेत्रांत अतिशय विकसित होतो. ब्रिटिशांनी आपल्याला ‘इंडिया’ हे गुलामीचे नाव दिले. त्याचा अर्थ ‘सिंधू नदीच्या पूर्वेकडील देश’ असा होतो. सर्वांनी योग, वेद आणि गीता यांप्रमाणे आचरण करणे आवश्यक आहे.