गुरूंचा महिमा गाऊया ।

सर्व साधकांवर कृपादृष्टी असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

गुरूंचा महिमा गाऊया ।
भावसत्संगाला जाऊया ।
अन् गुरूंचा महिमा गाऊया ।। धृ. ।।

कु. सविता जाधव

गुरुमाऊली माझ्या आयुष्यात आली ।
माझ्या जन्माचे सार्थक झाले ।
गुरुमाऊलीचे स्मरण करूया ।
आपल्या जन्माचे सार्थक करून घेऊया ।। १ ।।

गुरुमाऊली प्रक्रिया (टीप) राबवून घेते ।
अनेक जन्मांचे स्वभावदोष-अहं नष्ट करून घेते ।
गुरुमाऊली जन्म-मरणाच्या फेर्‍यांतून सोडवते ।
म्हणूनच सर्वश्रेष्ठ माझी गुरुमाऊली ।। २ ।।

माझी गुरुमाऊली आहे ब्रह्मस्वरूप ।
माझी गुरुमाऊली आहे नारायणस्वरूप ।
माझी गुरुमाऊली आहे श्रीरामस्वरूप ।
माझी गुरुमाऊली आहे श्रीकृष्णस्वरूप ।। ३ ।।

आता एकच ध्येय अन् एकच विचार ।
‘गुरूंच्या चरणी एकरूप होणे’ ।
हेच ध्येय निश्चित करून ।
गुरूंच्या चरणी लीन होऊन प्रार्थना करते ।। ४ ।।

वर्णन तिचे जेवढे करू, तेवढे अल्पच आहे ।
अशा या माझ्या गुरुमाऊलीच्या चरणी ।
कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते ।। ५ ।।

भावसत्संगाला जात असतांना ही कविता मला आपोआप सुचली.

टीप – स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया

– कु. सविता जाधव, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.४.२०२१)