शेतकरी विरोधी कायदे रहित करण्यासंदर्भात खासदार गिरीश बापट यांना निवेदन !

पुणे – शेतकरी पारतंत्र्य दिनानिमित्त किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने खासदार गिरीश बापट यांना शेतकरी विरोधी कायदे आणि परिशिष्ट ९ रहित करण्यासंदर्भात निवेदन दिले. सध्या अनुच्छेद ९ मध्ये २८४ कायदे असून त्यातील २५० शेतीशी निगडित आहेत. या कायद्याचा पुनर्विचार संसदेत सभापतींकडे अर्ज करून देता येतो त्याला खासदार बापट यांनी दुजोरा देऊन शेतकरी विरोधी कायदे रहित करण्याविषयी अर्ज करण्याचे शिष्टमंडळाला सुचवले. या वेळी किसान पुत्र आंदोलनाचे समन्वयक मयुर बागुल, अनंतराव देशपांडे आणि डॉ. राजीव बसर्गेकर उपस्थित होते.