जलपर्णी काढण्याच्या कामाचे देयक सव्वा ५ कोटी रुपयांचे !

ठेकेदारांचे अधिकार्‍यांशी साटेलोटे आहे का ? याचा शोध घेऊन संबंधितांवर त्वरित कारवाई होणे आवश्यक आहे !

महापौर माई ढोरे

पिंपरी – शहरातील जलपर्णीची समस्या पूर्णपणे निकाली निघाली नसतांना जलपर्णी काढण्याच्या कामाचे सव्वा ५ कोटी रुपयांचे देयक मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवण्यात आले; पण जलपर्णी काढण्याची कामे व्यवस्थित झाली नसल्याने ठेकेदारांना काळ्या सूचीत टाकावे. कोणत्याही परिस्थितीत ठेकेदारांची देयके देऊ नयेत, अशी स्पष्ट सूचना महापौर माई ढोरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना केली आहे.

जलपर्णी

महापौर माई ढोरे यांनी म्हटले आहे की, पवना इंद्रायणी आणि मुळा नदी यांच्या पात्रात जलपर्णी बेसुमार वाढली आहे. प्रक्रिया न करता नदीपात्रात सोडलेले सांडपाणी जलपर्णी वाढीसाठी पोषक ठरत आहे. यामुळे शहरवासियांना डास आणि कीटक यांचा त्रास सहन करावा लागत आहे. (प्रक्रिया न करता नदीपात्रात सांडपाणी सोडणार्‍यांवरही कठोर कारवाई करायला हवी ! – संपादक)