रामजन्मभूमी मुक्त होणे, हे प्रभु श्रीरामांच्या अस्तित्वाचे प्रमाणच ! – महंत पवनकुमारदास शास्त्रीजी, महामंत्री, अयोध्या संत समिती, उत्तरप्रदेश

महंत पवनकुमारदास शास्त्रीजी

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रामजन्मभूमी श्रीराममंदिराच्या उभारणीसाठी मुक्त करण्यात आली. प्रभु श्रीराम यांचे अस्तित्व होते, याचे हे एक प्रकारे प्रमाणच आहे. साम्यवादी विचारसरणीच्या लोकांना प्रभु श्रीराम अस्तित्वात होते, याचे आणखी कसले प्रमाण हवे ? ज्यांच्या जीवनपद्धतीतून धर्म नष्ट झाला आहे, ते ‘कम्युनिस्ट’ (साम्यवादी) आहेत. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला ‘देव कुठे आहे ?’, असे विचारून भगवान नारायणाच्या अस्तित्वाचे प्रमाण मागितले. सत्ययुगात भगवंताच्या अस्तित्वाचे प्रमाण द्यावे लागले. ईश्‍वर वर्तमानातच आहे, हे साम्यवादी विचारसरणीच्या लोकांनी लक्षात घ्यायला हवे.