गोवा राज्याने २२ कोटी रुपये किमतीच्या ‘आयव्हरमेक्टीन’ गोळ्या खरेदी केल्याचा आरोप खोटा !  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

डॉ. प्रमोद सावंत

पणजी, ९ जून (वार्ता.)-  सध्या कोरोनावर प्रतिबंधात्मक औषध म्हणून नागरिकांना देण्यासाठी राज्य सरकारने ‘आयव्हरमेक्टीन’ गोळ्या खरेदी केलेल्या नाहीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. ते म्हणाले, ‘‘गोवा शासनाने रुग्णांसाठी २२ कोटी रुपये किमतीच्या ‘आयव्हरमेेक्टीन’ गोळ्या खरेदी केल्या आहेत’, या आरोपाला काही आधार नाही. विलगीकरण केलेल्या रुग्णांना देण्यात येणार्‍या औषधांच्या संचामध्ये इतर औषधांसमवेत ठेवण्यास आवश्यक तेवढ्याच ‘आयव्हरमेक्टीन’ गोळ्या खरेदी करण्यात आल्या होत्या. आय.सी.एम्.आर्. (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने) कोरोना उपचारांविषयीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये पालट केल्यानंतर आरोग्य खात्याचा प्रतिबंधात्मक औषध समाजात वितरण करण्याचा प्रस्ताव आम्ही रहित केला.