मोरजी येथे अमली पदार्थांसह रशियाच्या नागरिकाला अटक

पेडणे – पेडणे पोलिसांनी एका धाडीत मोरजी येथे एका रशियाच्या नागरिकाला एल्एस्डी आणि गांजा या अमली पदार्थांसह अटक केली. या अमली पदार्थांची किंमत साडेआठ लाख रुपये आहे. याविषयी पेडणे पोलिसांना विश्‍वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली होती.