फलटण (जिल्हा सातारा) येथे धर्मांधांकडून दीड टन गोमांस पकडले !

अशा घटना वारंवार होतात, यावरूनच गोहत्या करणार्‍यांना कायद्याचा धाक नाही, हेच स्पष्ट होते. त्यामुळे पोलिसांनी गुन्हेगारांना कठोर शिक्षा करायला हवी !

सातारा, ४ जून (वार्ता.) – फलटण शहरातील कुरेशीनगर येथे धाड टाकून पोलिसांनी दीड टन गोमांस आणि २ चारचाकी वाहने, असा ९ लाख १० सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला आहे. या प्रकरणी ७ जणांविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

३ जूनच्या रात्री ८ वाजता याकूब कुरेशी, नय्युम कुरेशी आणि त्यांचे ५ सहकारी यांनी अनधिकृतपणे गोवंशियांची हत्या केली. याविषयी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची पडताळणी केली असता त्या ठिकाणी १ सहस्र ५०० किलो गोमांस, हत्या करण्यासाठी आणलेले गोवंशिय आणि २ चारचाकी वाहने आढळून आली. पोलिसांनी सर्व मुद्देमाल शासनाधीन केला असून पळून गेलेल्या संशयितांचा शोध चालू आहे.