पाकिस्तानने चीनच्या साहाय्याने बनवली कोरोना प्रतिबंधात्मक लस !

भारतातील काही मुसलमान संघटना चीनच्या लसीला भारतात विरोध करत होते. आता पाकमधील मुसलमान चीनच्या साहाय्याने बनवलेल्या लसीला विरोध करतील का ? कि ते त्याचा स्वीकार करून ‘आम्हाला ही लस घेण्याला पर्याय नाही’, असे दाखवतील ?

पाकिस्तान निर्मित लस

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानने चीनच्या साहाय्याने ‘PakVac’ नावाची कोरोना लस बनवली आहे. पाकिस्तानचे विशेष आरोग्य साहाय्यक डॉ. फैसल सुल्तान म्हणाले की, लस बनवण्यासाठी आम्हाला चीनने कच्चा माल पुरवला. तरीदेखील हे काम सोपे नव्हते. लवकरच ही लस मोठ्या प्रमाणात सिद्ध केली जाईल.

पाकिस्तानच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, आमच्या देशात चीनच्या लसीला बरीच मागणी आहे. लोकही चिनी लसीला प्राधान्य देत आहेत आणि ‘अ‍ॅस्ट्रॅजेनेका’सारख्या लसी टाळत आहेत. (जेथील सरकार चीनला चुचकारते, तेथील जनताही तसेच करणार, यात आश्‍चर्य ते काय ? – संपादक)